मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...

biofloc tank
biofloc tank

फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या जातीनुसार भिन्न असते. सूक्ष्मजैविक फ्लॅाक प्राणिप्लवंग सजीवांसाठी अन्न म्हणून वापरले जाते. बायोफ्लॉक तंत्रज्ञानामुळे अमोनियाची पातळी कमी करून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

बायोफ्लॉक (जैवपुंज )म्हणजे शैवाल, जिवाणू, प्रोटोझोन्स आणि इतर सेंद्रिय पदार्थ (मलमूत्र, न खाल्लेले खाद्य) यांचा एकत्रित पुंजका. मत्स्यसंवर्धन करत असताना मलमूत्र, न खाल्लेले खाद्य आणि अमोनियाच्या स्वरूपात नत्रयुक्त कचरा तयार होतो. कर्ब आणि नत्र (सीःएन) यांचे प्रमाण दहाच्या वर राखले जाते. तेव्हा हा नायट्रोजनयुक्त कचरा परपोषित जिवांणूद्वारे वापरले जातो. हे जिवाणू ष्लेष्म (चिकट द्राव्य) तयार करतात. त्यामुळे या जिवाणूंचा एकत्रित पुंजका तयार होतो. हा सूक्ष्मजैविक फ्लॅाक प्राणिप्लवंग सजीवांसाठी अन्न म्हणून वापरले जाते. वायुविजनाद्वारे हे फ्लॉक नेहमी तरंगत ठेवले जातात. अशाप्रकारे मत्स्यसंवर्धन करत असताना तयार होणारा कचरा हा संवर्धनयुक्त माश्यांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. बायोफ्लॉक तंत्रज्ञानामुळे अमोनियाची पातळी कमी करून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यपालन करत असताना बायोफ्लॉक तयार करणे महत्त्वाचे आहे. 

बायोफ्लॉकनिर्मितीचे तंत्र 

तलावाची तयारी 

  • बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यपालन करण्यासाठी शक्यतो पॉलिथिन आच्छादीत तलाव किंवा सिमेंटचे तलाव यांचा वापर करावा. 
  • सुरुवातीला तलावामध्ये अंदाजे ५० टक्के एवढे पाणी भरावे. इतर मत्स्यसंवर्धनीय तलावातून काढलेली माती हे विरजण म्हणून ५० किलो प्रति हेक्टर (५ किलो/टन) या प्रमाणात मिसळावे. फ्लॅाकच्या जलद उत्पादनासाठी प्रति हेक्टरी ५ ते २० किलो या दराने नायट्रोजन आणि कर्बस्त्रोत म्हणून मळी किंवा साखर मिसळावी.
  • वायुवीजन 

  • पाण्यामध्ये फ्लॉक तरंगत ठेवण्यासाठी, ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गाळ काढण्याच्या मार्गाजवळ गाळ केंद्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात अेरिअेटर्सचा वापर केला जातो.
  •  वायुवीजनासाठी पॅडल व्हील अेरिअेटर्स, सबमर्सिबल पंप, एअर ब्लोअर जोडलेला नोझल किंवा छिद्रीत पाइप यांचा वापर केला जातो.
  • फ्लॉकची पातळी व गाळ काढणे 

  • फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या जातीनुसार भिन्न आहे. 
  • कोळंबी संवर्धनसाठी फ्लॉकची पातळी ही १० ते १५ मिलि/ लिटर या प्रमाणात तर तिलापिया माश्यांकरिता पातळी ही २५ ते ५० मिलि/ लिटर या प्रमाणात ठेवली जाते. 
  • कालांतराने फ्लॉकचा आकार वाढतो. ते जड होऊन तळाशी स्थिर होतात. यामुळे अनअॅरोबिक विघटन होऊन हानिकारक वायू तयार होतात आणि त्यामुळे माश्यांवर ताण पडतो. म्हणून तलावामधून हा गाळ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ड्रेन पाइपमधून गाळ पंप (स्लज पंप) किंवा गुरुत्वाकर्षणाद्वारे नियमितपणे काढला जातो.
  • मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे जैवपुंज (बायोफ्लॅाक) तंत्रज्ञान वापरून मत्स्यबीज ते मत्स्यबोटुकली उत्पादनाचे प्रयोग घेण्यात आले. यासाठी फ्लॉकची मात्रा ही १० ते २२ मिलि/ लिटर या प्रमाणात मत्स्यबीज ते बोटुकली हे उत्पादन घेण्यासाठी ठेवण्यात आली होती.
  • - डॉ. केतन चौधरी, ९४२२४४११७८

     (मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com