आंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी त्यातील तुडतुडे, पिठ्या ढेकण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा अशा १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. जगभरात फळमाशीच्या ४०० हून अधिक जाती असून, ही कीड वर्षभर विविध फळपिकांवर आढळते. फळमाशीच्या बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस, बॅक्ट्रोसेरा झोन्याटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या प्रमुख तीन जाती आंबा पिकावर आढळतात. निर्यातीवेळी आंबा फळामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कटाक्षाने तपासला जातो. तो आढळल्यास मोठे नुकसान होऊ शकते. फळमाशीची ओळख व जीवनचक्र
नुकसान :- आंबा पिकामध्ये २५ ते ४० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आढळून येतो. फळांची गुणवत्ता कमी होते. ती खाण्यायोग्य राहत नाहीत. व्यवस्थापन :-
रक्षक सापळे :- या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवतात. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्या सापळ्यामध्ये आकर्षित होतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात. प्रमाण :- हेक्टरी २० ते २५ सापळे. पिकाच्या उंचीप्रमाणे ४ ते ५ फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत. काळजी : १८ ते २० दिवसांनी मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा बदलावा. सापळ्यातील मेलेल्या माश्या काढून सापळे स्वच्छ ठेवावेत. विषारी आमिष :- फळमाशीच्या तोंडाचे अवयव केवळ द्रवरूप स्वरुपात पदार्थ खाण्यायोग्य असतात. त्यांच्यासाठी विषारी आमिष तयार करताना खराब फळे, गुळ 200 ग्रॅम अधिक मॅलॅथिऑन (५० टक्के ई.सी.) २० मि.लि. प्रति २० लिटर पाणी या द्रावणाकडे फळमाश्या आकर्षित होतात. अशा अमिषांचा उपयोग बागेमध्ये ठिकठिकाणी करावा. डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक) , ९४२१६२१९१० विलास खराडे ( पीएच.डी. स्कॉलर), ९४२१५९६१७९ (कृषि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.