कांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात घेतले जाते. त्याच्या उत्तम वाढीसाठी १० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता पोषक असते. मात्र, दमट आणि ढगाळ हवामानामध्ये त्यावर प्रामुख्याने फुलकिडे, खोड कुरतडणारी अळी, वाळवी आणि हुमणी यांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यात फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नियंत्रण उपाययोजना
किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच,
तीव्र प्रादुर्भाव असल्यास, रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) फिप्रोनिल (५ एस. सी.) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मिली. टीप ः फवारणी करतेवेळी प्रतिलिटर १ मिली उत्तम दर्जाच्या चिकटद्रव्य कीटकनाशकासोबत मिसळावे.
ः डॉ. डी. आर. कदम, ९४२१६२१९१० ः व्ही. जी. सवडे, ९६७३११३३८३
(लेखक डॉ. कदम हे कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, येथे सहयोगी प्राध्यापक असून, श्री. सवडे हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.