गहू पिकाला एकच पाणी देणे शक्य असल्यास ते लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे. पहिल्या पाण्याच्या वेळेला युरिया खताचा दुसरा हप्ता हेक्टरी १३० किलो युरिया द्यावा. हलक्या जमिनीमध्ये पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
पाणी व्यवस्थापन
पाणी | देण्याची वेळ | पिकाची अवस्था |
पीक वाढीच्या काळात पाणी व्यवस्थापन | पीक वाढीच्या काळात पाणी व्यवस्थापन | पीक वाढीच्या काळात पाणी व्यवस्थापन |
पहिले पाणी | पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी | मुकुटमुळे फुटण्याची सुरवात |
दुसरे पाणी | पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी | कांडी धरण्याची अवस्था |
तिसरे पाणी | पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी | पीक फुलोऱ्यात असताना |
चौथे पाणी | पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी | दाणे भरण्याची अवस्था |
संपर्क : डॉ. भरत रासकर ८७८८१०१३६७ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.