कापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात. उपटलेल्या पऱ्हाट्या शेतात तशाच न ठेवता जाळून नष्ट कराव्यात.
भुईमूग :
मावा,तुडतुडे व पाने पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण फवारणी ः (प्रति लिटर पाणी) इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथीन (५ टक्के)०.६ मि.लि.
सूर्यफूल :
रसशोषक कीड नियंत्रण (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) फवारणी ः (प्रति लिटर पाणी) इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२ मि.लि.
केसाळ अळी नियंत्रण अंडीपुंज तसेच अळ्यासहीत पाने तोडून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत. फवारणी ः (प्रति लिटर पाणी) निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन १०,००० पीपीएम २.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के) १.३ मि.लि.
पानावरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) रोग नियंत्रण : फवारणी ः (प्रति लिटर पाणी) मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
मूग : पेरणीपासून ४५ दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. तीळ : पेरणीनंतर एक महिन्याने प्रतिहेक्टरी ५४ किलो युरिया द्यावा. ज्वारी :
मावा नियंत्रणासाठी फवारणी : (प्रति लिटर पाणी) डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि. खोडवा ऊस :
संपर्क : डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०, डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.