सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून तुरळक प्रमाणात मोहोर येण्यास सुरवात होते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात बागेमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर येण्यास सुरवात होते. सर्वसाधारणपणे पावसाळा संपल्यानंतर बागांची साफसफाई केली जाते. त्यात बागेमधील दाट वाढलेल्या आंबा झाडांच्या फांद्याची विरळणी करावी. झाडामध्ये पुरेसा प्रकाश पडून, हवा खेळती राहील, याकडे लक्ष दिल्यास कीड व रोग यांच्या वाढीस आळा बसतो. विरळणीनंतर आंब्यावर किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसल्यानंतरच फवारणीचे नियोजन करावे. आंब्याच्या पालवीवर प्रामुख्याने खालील किडी येतात.
तुडतुडे : नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ आंब्याचा मोहोर, कोवळी पालवी, कोवळी फळे यातून रस शोषतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. तुडतुड्याच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळ्या रंगाच्या (कॅपनोडीयम) बुरशीची वाढ होते. पाने काळी पडतात. (यालाच स्थानिक भाषेत ‘खार पडणे’ असे म्हटले जाते.) नियंत्रण व्यवस्थापन :
बागेतील हापूस, रायवळ अशा सर्व झाडे व त्यांच्या खोडावर फवारणी करावी. खोडांवरील सुप्तावस्थेतील तुडतुड्यांचे नियंत्रण होईल.
फुलकिडे : नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ फुलकिडे पानाची साल खरवडून पानातील रस शोषतात. पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पानगळ होऊन शेंडे शिल्लक राहतात. कोवळ्या फळांवरील साल खरवडल्यामुळे काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते.
मिजमाशी : नुकसानीचा प्रकार :
मिजमाशीच्या नियंत्रणासाठी :
शेंडा पोखरणारी अळी : नुकसानीचा प्रकार :
किडीच्या नियंत्रणासाठी :
लाल कोळी : नुकसानीचा प्रकार :
संपर्क : डॉ. विजयकुमार देसाई, ९४०३६४१११६ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)
टीप : केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे सन २०२० पासून डायक्लोरव्हाॅसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जलस्रोतावर परिणाम होणार नाही, यादृष्टीने याचा वापर करावा. उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशींचा काटेकोर वापर करावा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.