Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष, ८ लाख ९३ हजार ७७८ स्त्री, तर ४१ इतर असे एकूण १८ लक्ष ७३ हजार ५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार, असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली..जिल्ह्यात राबवावयाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत नुकताच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, व इतर आदी उपस्थित होते. .Local Body Elections: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकांसाठी चुरशीने मतदान.जिल्हाधिकारी स्वामी यांनी या वेळी निवडणूक यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्धता, मतदान यंत्रे उपलब्धता, जिल्हा पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, तालुका पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, प्रतिबंधात्मक कारवाई, कायदा सुव्यवस्था बाबत आढावा घेतला.जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समितीचे १२६ गण क्षेत्रात होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नैसर्गिक आपत्तींबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही.जातवैधता पडताळणीबाबत.Local Body Election: अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी शांततेत मतदान.राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.....असा आहे निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशन पत्र दाखल करणे-१६ ते २१ जानेवारी २०२६.नामनिर्देशन पत्र छाननी-२२ जानेवारी २०२६ सकाळी ११ वाजेपासूनउमेदवारी माघारी- २३ ते २७ जानेवारी २०२६निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी- २७ जानेवारीमतदान-५ फेब्रुवारी २०२६मतमोजणी-७ फेब्रुवारी सकाळी १० वाजेपासून..तालुकानिहाय गट व गणांची संख्यासोयगाव-३ गट, ६ गणसिल्लोड-९ गट, १८ गणकन्नड-८ गट, १६ गणफुलंब्री-४ गट, ८ गणखुलताबाद-३ गट, ६ गणवैजापूर-८ गट, १६ गणगंगापूर-९ गट, १८ गणछत्रपती- संभाजीनगर १० गट, २० गणपैठण- ९ गट, १८ गण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.