Nagpur News: यंदाच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी शून्य टक्के निधी खर्च वितरित केल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात शनिवारी (ता. १३) दिली..राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध याजेनांसाठी निधीची तरतूद केली आहे. मात्र वितरण करण्यात सरकारने हात आखडता घेतल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मधून देण्यात आले होते. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर ४६ लाख ५८ हजार ३२० लाभार्थ्यांची निवड केली आहे. मात्र अनुदान वाटपासाठी निधीची गरज नसल्याचे सांगून शेतकरी अनुदानासाठी हेलपाटे मारत नसल्याचेही श्री. भरणे यांनी उत्तरात सांगितले..Farm Pond Scheme: सातारा जिल्ह्यातील शेततळ्यासाठी ५१९ शेतकरी पात्र .अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. शेतकऱ्यांनी कृषी योजनांतील अनुदानाच्या मागणीकरिता ४८ लाख अर्ज दाखल केले होते. कृषी यंत्रणा तसेच अवजारांवर मिळणारे अनुदान, सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान, मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया अनुदान, फलोत्पादन योजना, शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांनी खर्च केलेल्या रकमेसह अनुदान मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे..या योजनांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान वाटपाकरिता किती निधीची गरज आहे, त्यापैकी केंद्र तसेच राज्य शासनाकडून किती निधी खर्च होईल, याचा अंदाज न घेता कृषी विभागाने अर्ज मागवून अनुदान दिले नसल्याचे समोर आले आहे. तसेच अनुदानासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे, हे खरे आहे का, असा प्रश्न आमदार खोडके यांनी उपस्थित केला होता..या प्रश्नाला उत्तर देताना ‘हे खरे नाही’ असे उत्तर श्री. भरणे यांनी दिले. सध्या ४६ लाख ५८ हजार ३२० लाभार्थ्यांची निवड केली आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता हिवाळी अधिवेशनात १२७ कोटी ७१ लाख निधीची पूरक मागणी केली आहे. केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याच्या निधीचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयामार्फत केंद्र सरकारला पाठविला आहे..Farm Pond: आळंदी म्हातोबा ग्रामस्थांचे लोकवर्गणीतून शेततळे.निधीला मान्यता मात्र वितरणात हात आखडताकृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली आहे. मात्र वितरणात हात आखडता घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर केला होता. या निधीला प्रशासकीय मान्यता आहे. मात्र यातील एकही रुपया वितरित करण्यात आलेला नाही. .केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी २२५ कोटी ९० लाखांच्या निधीपैकी २०४ कोटी १४ लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी ८२ लाख ६७ हजार रुपये वितरित केले आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ४०० कोटींपैकी सर्वच निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली त्यापैकी २०० कोटी रुपये वितरित केले आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ५०४ कोटी ८३ लाख १७ हजार रुपयांपैकी ५९६ कोटी ५८ लाख रुपये ३३ हजार रुपयांना प्रशासकीय मान्यता दिली आहे..त्यापैकी २५१ कोटी ४१ लाख ७० हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेसाठी ४०० कोटींपैकी १०० कोटी वितरित केले आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाख निधीपैकी ६२ कोटी ७० लाख रुपये वितरित केले आहेत. मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेसाठी ७५ कोटींपैकी ३१ कोटी ९७ लाख ७५ हजार रुपये, तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी १७५ कोटी ४१ लाख ६७ हजार निधीपैकी ६८ कोटी ३३ लाख ३३ हजार निधी वितरित केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.