Rural Development: दुग्ध व्यवसाय हा आता शेतीचा जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय बनला असून स्वच्छ व दर्जेदार दूध उत्पादन हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उतरावे, असे आवाहन कात्रज जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी केले..सकाळ-ॲग्रोवन आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अजित सप्ताह’ अंतर्गत खेड तालुक्यातील चिखलगाव येथे ‘स्वच्छ दूध उत्पादन व पशुप्रजननातील नवीन प्रगती’ या विषयावर ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम मंगळवारी (ता. २१) झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांभारे होते..Dairy Business: दुग्ध व्यवसायात तरुणांना मोठी संधी : डॉ. भिकाणे.डेअरी फार्मिंग सल्लागार नीलेश लगड यांनी उच्च उत्पादनक्षम कालवडींची निर्मिती, योग्य कृत्रिम रेतन, स्वच्छ दूध उत्पादन, पशुप्रजननातील आधुनिक तंत्रज्ञान आणि डेअरी व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन केले. .Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्न शक्य : प्रा. कुलकर्णी.कात्रज डेअरीचे आहारतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण सोबळे यांनी दूध काढण्याची शास्त्रीय पद्धत, फॅटचे प्रमाण, दूध शीतकरण आणि जनावरांच्या पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती दिली..ॲग्रोवनचे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) योगेश निगडे यांनी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी व पशुपालनविषयक माहिती पोहोचविण्यात ॲग्रोवनची भूमिका स्पष्ट केली. कात्रज दूध संघाचे विक्रम पानसरे व प्रशांत गव्हाणे यांनी सेंद्रिय शेती व सुरक्षित अन्न उत्पादनाचे महत्त्व सांगितले. या वेळी शेतकऱ्यांना मका बियाणे, मिनरल मिक्स्चर आणि पशुधनासाठी आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.