पोपटराव पवारDigital India: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने शेती, आरोग्य, कृत्रीम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून गावपातळीवरील विकासाला चालना मिळेल. तसेच तरुण व महिलांच्या प्रगतीला हातभार लागेल. नारळाच्या शेतीला प्रोत्साहन दिल्याने त्याच्या विकासाला मदत मिळेल असे या अर्थसंकल्पातून दिसत आहे..देशात शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि एकूणच शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शेतीचा विकास महत्त्वाचा आहे. केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार प्रमुख्याने चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणाऱ्या योजना आणल्या जाणार आहेत. काजू आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच भारतीय काजू प्रिमियम ब्रँड म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे..यामुळे निर्यात वाढेल. अशा योजनांमुळे कोकणातील काजूशेतीला फायदा होईलच. खरं तर पूर्वी नारळ शेती केवळ कोकणात, किनारपट्टीत व्हायची. आता राज्यातील अन्य भागांतील, अगदी दुष्काळी भागातील शेतकरी नारळ शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे देशभरात नारळ उत्पादक शेतकऱ्यांना अशा योजनेचा मोठा फायदा होणार आहे. डोंगराळ भागात जर्दाळू, अक्रोड आणि बदाम या पिकांच्या लागवडीला चालना दिली जाईल..Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच.या पिकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवण्यात येतील. जेणेकरून कठीण भौगोलिक परिस्थितीतही शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल. कधीकाळी चंदनाची शेती फारशी कोणी करीत नव्हते. मात्र आता अधिक उत्पादन देणाऱ्या चंदन शेतीकडे शेतकरी वळत आहेत. चंदनाच्या लागवडीसाठी राज्ये आणि शेतकऱ्यांना विशेष साहाय्य दिले जाईल असे अर्थसंकल्पावरून जेणेकरून ही महागडी आणि मागणी असलेली पिके पुन्हा एकदा भारताची ओळख बनू शकेल असे वाटते..रासायनिक खते, कीडनाशके यांचा अति किंवा असंतुलित वापर होत असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अर्थसंकल्पात प्रामुख्याने कर्करोगावरील सतरा प्रकारच्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. सरकारचा हा प्रयत्न चांगला दिसतो आहे. परंतु समाधानाची बाब म्हणजे आरोग्यदायी अन्ननिर्मितीसाठी प्रयत्न होणार आहेत. शेतकरी शेततळे व अन्य माध्यमातून मस्त्यशेती करत आहेत. एकात्मिक मत्स्य केंद्रे उभारणी ही बाबी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे..युवक हा देशाचा महत्त्वाचा घटक असून क्रीडा क्षेत्रालाही धोरणात्मक चालना देण्याचे प्रयत्न आहेत. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक होणार असल्याने तरुणांच्या विकासासाठी निश्चित आशादायक चित्र असू शकेल. ग्रामीण भागाचा, खेड्यांचा विकास, शेती विकासाला चालना या बाबी महत्त्वाच्या आहेत..Agri Union Budget 2026: भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक घोषणा.शेतीसाठी अलीकडे ‘एआय’ तंत्रज्ञान महत्त्वाचे मानले जात आहे. अर्थसंकल्पात शेतीसाठीच्या ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबत विशेष लक्ष दिल्याचे दिसते आहे. त्याचा वापर वाढल्यास शेतीतील अचूकता दिसेल.केंद्र सरकारकडून यासाठी मदतीचा हात मिळेल. शेतकऱ्यांचा शेतीतील निविष्ठांवर नाहक होणारा खर्च निश्चित कमी होईल आणि उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होईल. या बाबी दिलासादायक म्हणायला हव्यात..गावांचा विकासगावांचा विकास हा विकसित भारताचा पाया आहे. गावे सक्षम झाली पाहिजेत यासाठी सरकारी पातळीवर नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. अर्थसंकल्पातील बाबी पाहिल्या तर ग्रामविकासाठी सुरु असलेले प्रयत्न निश्चित विकासाला चालना देणारे दिसत आहेत. मात्र ग्रामविकासासाठी दिला जाणाऱ्या निधीचा योग्य पद्धतीने विनियोग आणि दर्जेदार कामे यावर भर द्यावा लागणार आहे. ग्रामविकास, शेती, पाणी याबाबत तरुणांचा सहभाग वाढण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत..शेतीत महिलांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे महिलांच्या विकासासह पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला अधिक सवलती, लखपती दिदीसारख्या योजना , मॉल्स व अन्य योजना याद्वारे विकासाची संधी देण्याची घोषणा झाली ही बाब चांगली आहे. सन २०२६ मध्ये पायाभूत सुविधांवर १२ हजार कोटीची गुंतवणूक करून विकास साधणे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल असे दिसते आहे..अनेक प्रभावी योजना आणल्या आहेत. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळतेय आहे. मात्र त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याची जबाबदारी निश्चित करणे देखील गरजेचे ठरणार आहे. प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेले शेतकऱ्यांनी विकले पाहिजे यासाठी त्यात गट किती सहभागी होतात हेही पाहणे गरजेचे ठरणार आहे.(लेखक आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.