Yavatmal News: अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाचाही आधार मिळत नसल्याने पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे विदारक वास्तव ईसापूर धरण परिसरात समोर आले. अत्यल्प बाजारभावामुळे दोन एकर केळी बागेवर जेसीबी फिरविण्याची वेळ येथील युवा शेतकरी संदीप विठ्ठलराव नाईक यांच्यावर आली..अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यानंतर केळीच्या पिकातून आर्थिक स्थैर्य मिळेल, या अपेक्षेने नाईक यांनी सव्वादोन एकर क्षेत्रात टिश्यू कल्चरच्या सुमारे ३ हजार रोपांची लागवड केली होती. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने खते व पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. परिणामी दर्जेदार आणि घडांनी लदबदलेली केळी तयार झाली..Farmer Issue: ‘जाचक अटी दूर करून कापूस, सोयाबीन खरेदी करा’.मात्र, बाजारात केळीचे दर अचानक कोसळल्याने अपेक्षित मोबदला मिळाला नाही. काही घडांच्या विक्रीतून जेमतेम उत्पन्न हाती आले. दर वाढतील या आशेने अतिरिक्त खर्च करून बाग टिकवून ठेवली; परंतु दरातील अनिश्चितता कायम राहिली. व्यापाऱ्यांनी ‘दर पडले’ असे कारण देत बागेकडे फिरकणेही टाळले. अखेर इतर पिकांसाठी जमीन मोकळी करण्याच्या उद्देशाने संपूर्ण केळी बागेवर जेसीबी फिरविण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. .Flower Farmer Issue: बाजारभावातील घसरणीमुळे झेंडू उत्पादक अडचणीत.नाईक यांनी केळी पिकासाठी सुमारे १ लाख ७० हजार रुपये खर्च केला होता. मात्र त्यातून केवळ २५ हजार रुपयांपर्यंतच उत्पन्न मिळाले. परिसरात अनेक शेतकरी केळी उत्पादनाकडे वळत असताना, साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे व्यापाऱ्यांकडून दराबाबत अडवणूक होत असल्याचेही वास्तव समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हमीभाव, साठवणूक सुविधा आणि शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची गरज ऐरणीवर आली आहे..यासंदर्भात शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले, ‘‘हमीभावाच्या अभावामुळे ही स्थिती केवळ केळीपुरती मर्यादित नसून सर्वच पिकांच्या बाबतीत आहे. प्रचंड मेहनत करून पिकवलेल्या धान्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.