Agriculture Update: दुष्काळी पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या एक-दोन चांगल्या पावसामुळे खरीप पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मात्र पश्चिम भागात पेरणीयोग्य पाऊस नुकताच झाल्याने तेथील पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ५० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, पाऊस कायम राहिल्यास त्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. पावसाअभावी दोन-तीन आठवडे पेरण्या लांबल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी यंदाही मक्यालाच सर्वाधिक पसंती दिली असून सोयाबीनच्या क्षेत्रातही काहीशी वाढ दिसून येत आहे..तालुक्यातील प्रमुख हंगाम खरीप असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरण्या उरकल्या जातात. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने नियोजन विस्कळीत झाले. तरीही उशिराने पेरणी करून हंगाम वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. .Kharif Sowing: विदर्भात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.खरीप पिकांच्या ७३ हजार १२१ हेक्टर उद्दिष्ट क्षेत्रापैकी ३६ हजार ४४८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, हे प्रमाण ४९.८५ टक्के आहे. पूर्व भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या वेगाने सुरू झाल्या असून गेल्या दोन दिवसांत इतर भागातही पाऊस झाल्याने उर्वरित क्षेत्रावर पेरणीला गती मिळण्याची शक्यता आहे..Kharif Sowing Update: अकोला जिल्ह्यात २.८८ लाख हेक्टरवर खरीप लागवड पूर्ण.तालुक्यात ३९ हजार ४३३ हेक्टर उद्दिष्टापैकी २३ हजार ९१६ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून, हेच प्रमुख पीक ठरले आहे. त्याखालोखाल सोयाबीन ५ हजार ३३ हेक्टर (४८ टक्के), मूग ३ हजार ५३० हेक्टर (४६ टक्के) आणि बाजरी २ हजार ८२६ हेक्टर (४० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे..तूर पिकाच्या ३८६ हेक्टरपैकी ३१८ हेक्टर (८२ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र कापसाच्या ५ हजार ७२७ हेक्टर उद्दिष्टापैकी केवळ १९७ हेक्टर (३ टक्के) आणि भुईमुगाच्या २ हजार ३२४ हेक्टरपैकी ५४९ हेक्टर (२३ टक्के) क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. ज्वारी, उडीद व सूर्यफूल पिकांची पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. पुढील काही दिवस पाऊस कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरण्या झपाट्याने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.