Nashik News: येवला तालुक्यात आधुनिक कृषी भवन उभारण्यासाठी १३ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे येवल्यात सुसज्ज असे कृषीभवन उभे राहणार असून तालुक्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे..राज्याच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मंजुरी मिळाली आहे..Agriculture Development: कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न.येवला तालुक्यात कांदा, द्राक्ष, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन येथे घेतले जाते. शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन, विविध योजनांची माहिती, तांत्रिक साह्य आणि शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात..Agriculture Bhavan: अमरावतीच्या कृषी भवनला हवा इच्छाशक्तीचा टेकू .या उद्देशाने येवला येथे आधुनिक सुविधा असलेले कृषी भवन उभारण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. .या कृषी भवनामध्ये कृषी विभागाच्या विविध शाखा, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र, प्रशिक्षण सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारी व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या बैठका व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.