Irrigation Water Supply: कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणातून दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी कुकडी डावा कालव्यात १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पुढील तीस दिवसांत या कालव्यात सुमारे तीन टीएमसी पाणी वापर होणार आहे. या पाण्याचा उपयोग जुन्नर, पारनेर, कर्जत, करमळा, श्रीगोंदा या तालुक्यांना सिंचन, बिगर सिंचनासाठी होणार आहे..कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणातून १४ मेपासून उन्हाळी दुसरे आवर्तन सुरू केले होते. पहिल्या टप्प्यात मिना शाखा, मीनापूरक, पिंपळगाव जोगे, डिंभा डावा या कालव्यात पाणी सोडले होते. दुसऱ्या टप्प्यात डिंभे उजवा व कुकडी डावा कालव्यात पाणी सोडले आहे..Dudhana Dam Water Level: निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३९.७७ टक्के पाणीसाठा.कुकडी प्रकल्पाअंतर्गत सर्वात जास्त व पाच तालुक्यांना जोडणारा सुमारे २४९ किलोमीटर लांबीचा कुकडी डावा कालवा आहे. दरम्यान, २५ जून रोजी हे आवर्तन बंद करण्यात येणार आहे. .Doddnala Water Project: दोड्डनाला प्रकल्प ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरा.कुकडी प्रकल्पात बुधवारअखेर (ता.२७) ४.०६३ टीएमसी (१३.६९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली..जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा आदी तालुक्यांना लाभकालव्यात २५ मेपासून १४०० क्युसेकने पाणी सोडले आहे. हे आवर्तन सुरू राहण्यासाठी येडगाव धरणात पिंपळगाव जोगे धरणातून ६०० तर चिल्हेवाडी धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडले आहे. टेल टू हेड या निकषाप्रमाणे जुन्नर, पारनेर, कर्जत, करमळा, श्रीगोंदा या तालुक्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.