Ahilyanagar News: रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीची यंदा राज्यात आतापर्यंत १३ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी १५ लाख ४० हजार हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे आतापर्यंतच्या ज्वारी पेरणीचा विचार केल्यास राज्यात १ लाख ८० हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. .पेरणी कालावधी संपल्याने आता यंदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता नाही. घटत्या क्षेत्राचा चारा उत्पादनासह अन्नधान्य उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. मागील सव्वीस वर्षांत राज्यात ज्वारीचे सुमारे १८ लाख हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे..Jowar Farming: खानदेशात दादर ज्वारी पीक निसवले.ज्वारी हे रब्बीतील प्रमुख पीक आहे. अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, लातूर, बीड, जालना, धाराशिव, परभणी, नांदेड, सांगलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांत ज्वारी घेतली जाते. यंदा सात जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात नंदुरबार, जळगाव, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे..ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी नवीन वाण विकसित केलेले असले तरी सर्वाधिक मागणी असलेल्या ‘ज्यूट, बेद्री, मालदांडी’ यांसारख्या जुन्या, देशी वाणाला शेतकरी अजूनही पसंती देत आहेत. यापूर्वी रब्बीत ज्वारीची हेक्टरी उत्पादकता ५ ते ९ क्विंटल असायची. अलीकडच्या सात ते आठ वर्षांत सुधारित वाणांमुळे उत्पादकता १२ क्विंटलच्या जवळपास गेली आहे. खरिपातही हेक्टरी १२ ते १३ क्विंटलच्या जवळपास उत्पादकता असते..Jowar Crop Management: ढगाळ हवामानात ज्वारीवर किडींचा वाढता धोका; वेळीच करा नियंत्रण.परंतु ज्वारीला मागणी असूनही वर्षागणिक क्षेत्र घटतच चालले आहे. राज्यात ज्वारीचे क्षेत्र घटत असल्याने कृषी विभागाकडून सरासरी क्षेत्रही कमी केले जात आहे. यंदा राज्याचे १४ लाख ९५ हजार ७९२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा सरासरीच्या ९१ टक्के म्हणजे १३ लाख ६१ हजार हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. कृषी विभागाने अजून अंतिम अहवाल प्रसिद्ध केला नसला तरी पेरणी कालावधी संपलेला असल्याने आता ज्वारीचे क्षेत्र वाढीची शक्यता नाही..२६ वर्षांत १८ लाख हेक्टरने घटमागील सव्वीस वर्षांतील उत्पादनाचा विचार केला तर राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल १८ लाख २३ हजार हेक्टरने घट झाली आहे. २००१-०२ साली रब्बी ज्वारीची ३१ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. ज्वारीचा पट्टा असलेल्या अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांत पेरणी क्षेत्र वर्षागणिक घटत चालले आहे..प्रमुख जिल्ह्यांतील यंदाचे ज्वारी क्षेत्र (हेक्टरमध्ये)अहिल्यानगर ः १,२३,१६३, धुळे ः १३,०८४, जळगाव ः ५०,१९९, पुणे ः ७७,००६, सोलापूर ः २२४४८७, सातारा ः ११३५४३, सांगली ः ११३९५६, कोल्हापूर ः ११४१४, छत्रपती संभाजीनगर ः २६७४२, जालना ः ६८०६६, बीड ः १५९२५८, लातूर ः ३८६५३, धाराशिव ः १६९४३२, नांदेड ः ३९८१२, परभणी ः ८८६३०, हिंगोली ः१६०६२, बुलडाणा ः १२,२३३.वर्षनिहाय रब्बीतील ज्वारी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)२०००-०१ः (३१ लाख ८४ हजार), २००१-०२ ः (३३ लाख ५७ हजार), २००२-०३ ः (३० लाख ८६ हजार), २००३-०४ ः (२८ लाख ५४ हजार), २००४-०५ ः (३२ लाख २३ हजार), २००५-०६ ः (३२ लाख ६८ हजार), २००६-०७ (३२ लाख ०९ हजार), २००७-०८ ः (२८ लाख ७७ हजार), २००८-०९ ः (३२ लाख २४ हजार) २००९-१० ः (३१ लाख १२ हजार), २०१०-११ ः (३० लाख २८ हजार), २०११-१२ ः (२३ लाख ३३ हजार), २०१२-१३ ः (२४ लाख ०१ हजार), २०१३-१४ ः (२७ लाख ८१ हजार), २०१४-१५ ः (२६ लाख ०८ हजार), २०१५-१६ ः (२५ लाख ९७ हजार), २०१६-१७ (३० लाख १२ हजार), २०१७-१८ (२८ लाख ९९ हजार), २०१८-१९ ः (१९ लाख ०९ हजार), २०१९-२० ः (१९ लाख ८१ हजार), २०२०-२१ ः (१६ लाख ६० हजार), २०२१-२२ ः (१२ लाख ४४ हजार), २०२२-२३ ः(१४ लाख), २०२३-२४ः (१६. लाख), २०२४-२५ः (१५ लाख ४० हजार) २०२५-२६ः (१३ लाख ६१ हजार) (२० जानेवारी अखेर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.