Maharashtra Rains : यवतमाळ जुलै महिन्याच्या अखेरच्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे ५३५ गावांतील ४१ हजार ५५६ शेतकरी बाधित झाले असून, ३६ हजार १३५.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३५ हजार २७७.८२ हेक्टर कोरडवाहू, ७.९० हेक्टर बागायती, ९.४० हेक्टर बहुवार्षिक फळपिके आणि ८४०.२७ हेक्टर खरडून गेलेल्या शेतजमिनीचा समावेश आहे. नुकसानीपोटी ३१५ कोटी रुपयांचा मदत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे..यंदा मॉन्सूनच्या विलंबामुळे सुरुवातीला खरीप पेरण्यांना खोळंबा झाला होता. जूनअखेर झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. जिल्ह्यात तब्बल ८ लाख ६७ हजार ९९० हेक्टरवर कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, कडधान्ये, फळपिके आणि भाजीपाल्याची लागवड झाली. .Monsoon Break: पावसाची ओढ, तरीही जिल्ह्यात ९२ टक्के पेरण्या.जूनमध्ये पावसाची तूट राहिल्याने जुलैतील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते. मात्र जुलैअखेर पावसाने रौद्ररूप धारण केले. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात १३५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला, तर प्रकल्पांमधील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. परिणामी, काही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. .Marathwada Kharif Sowing: मराठवाड्यात केवळ २२ टक्के खरीप पेरणी.अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूकही ठप्प झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम खरीप पिकांवर झाला. तालुकानिहाय नुकसानीत दारव्हा तालुका आघाडीवर असून ८ हजार ९६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ नेरमध्ये ७ हजार ३५२.१०, आर्णीत ५ हजार ७५२, घाटंजीत ४ हजार ३८७.६५, कळंबमध्ये १ हजार २२८ आणि यवतमाळ तालुक्यात १ हजार १३३.३२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बाभूळगाव १ हजार ८८२.२१, वणी १ हजार ५३६.१९, झरीजामणी १ हजार ५३६.१९, दिग्रस ९३.८८, राळेगाव ३४.५५, महागाव ४९२.४५ आणि पांढरकवडा १९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. .इतकेच नाही तर मुसळधार पावसामुळे ४ हजार २६३ शेतकऱ्यांची ८४०.२७ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. यामध्ये ५.७६ हेक्टर जमिनीचे कायमस्वरूपी नुकसान झाले असून ८३४.५१ हेक्टर जमीन दुरुस्त होण्यायोग्य आहे. खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी १५ कोटी २ लाख ९२ हजार रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे..तीन तालुक्यांना दिलासाजिल्ह्यातील १३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असताना पुसद, उमरखेड आणि मारेगाव तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात आढळले नाही. त्यामुळे या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.