Ahilyanagar News: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात कृषी औद्योगिक क्रांती राबवली. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया त्यांनी घातला. राज्याच्या व देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असे मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले..यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना संगमनेर येथील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील यशवंत तीर्थ येथे अभिवादन करण्यात आले. त्या वेळी श्री. थोरात बोलत होते..Yashwantrao Chavan : महाराष्ट्राचे राजकीय विद्यापीठ यशवंतराव चव्हाण.या वेळी शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, प्रा. जी. बी. काळे आदी उपस्थित होते..Yashwantrao Chavan: यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार.श्री. थोरात म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विकासाची वाट दाखवली. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करताना सहकार क्षेत्रासह साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांत दिशादर्शक काम केले. श्री. चव्हाण हे अत्यंत साधे जीवन जगले. देशाचे उपपंतप्रधान व इतर महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. .ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाबरोबर संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वाटचालीतही त्यांचे मोठे योगदान आहे. ते महाराष्ट्रातील राजकारण क्षेत्रासाठी मापदंड आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम करत आहोत. अत्यंत मोठे पण साधे व्यक्तिमत्व असलेल्या या माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कळस आणला. त्यांचे आदर्श जीवन कार्य महाराष्ट्रातील सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.