संतांचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ।।तेचि माझे हित करिती सकळ । जेणे हा गोपाळ कृपा करी ।।.Religious Event: अभंगपंक्तींचा हा भावार्थ जणू साकार झाल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील २१ संत व सद्गुरूंच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा वरळीत भक्तिभावात सुरू झाला आहे. वारकरी परंपरेचा सुगंध, नामस्मरणाचा गजर आणि संतचरणी नतमस्तक होण्याची भक्तांची ओढ यामुळे परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघत असून, हजारो भाविक या अद्वितीय सोहळ्याचा लाभ घेत आहेत..Shri Guru Paduka Darshan: हरिनामाच्या गजरात ‘श्री गुरु पादुका दर्शन’ सोहळ्याची भक्तिमय सांगता!.‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याचे उद्घाटन शनिवारी (ता. २१) स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते आणि आध्यात्मिक व योगगुरू श्री एम यांच्या उपस्थितीत झाले. ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’च्या संचालक मृणाल पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..दरम्यान, येथे आयोजित संत आणि सद्गुरूंच्या २१ पादुकांचा दर्शन सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आज (रविवारी) सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत पादुका दर्शन सोहळा चालणार आहे. याशिवाय, सकाळी १० वाजता आध्यात्मिक व योगगुरू श्री एम यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे..Shri Paduka Darshan Sohala : अहंकारमुक्तीतूनच सुखाची अनुभूती!.‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ याची अनुभूती भाविक घेत आहेत. नेटके नियोजन, सहज-सुलभ दर्शन, ध्यानधारणा, हरिनामाचा अखंड गजर, विविध संस्था व शालेय मुलांनी गुरुचरणी अर्पण केलेली संगीत सेवा यांमुळे भारावलेल्या भाविकांनी ‘सकाळ’च्या या ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले..जीवनात सत्संग आणि नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टींमुळे मन शुद्ध होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. संतांच्या पादुकांसमोर नतमस्तक होताना आपण त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा, हीच खरी गुरुभक्ती आहे. - स्वामी स्वरूपानंद महाराज, आंतरराष्ट्रीय प्रमुख, चिन्मय मिशन.गुरुमंत्र जपणाऱ्यांना गुरू स्वतः हृदयात अनुभवता येतो आणि पादुका ही त्या अनुभूतीचे एक प्रतीकात्मक रूप आहे. पादुका म्हणजे केवळ एक वस्तू नसून त्यांच्या दर्शनातून गुरूंची उपस्थिती आणि कृपा अनुभवता येते. - आध्यात्मिक योगगुरू श्री एम.संत, साधू, सद्गुरू आणि समाज एकत्र आला तरच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. ‘स्व’मध्ये बदल घडवू शकलो, तर समाजाला अधिक सशक्त करण्यासह भारताला विश्वगुरू बनविता येईल. - अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, ‘सकाळ माध्यम समूह’ आणि अध्यक्ष, ‘एपी ग्लोबाले’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.