Solapur News : पशुसंवर्धन विभागाच्या सघन कुक्कुट विकास गटाच्या वतीने जिल्ह्यात १० ऑक्टोंबर हा दिवस जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला. अंगणवाडी व नेहरू नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बापूजी प्राथमिक शाळा, लष्कर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राज्य राखीव पोलिस दल, गट क्र. १० आणि सघन कुक्कुट विकास गट येथील प्रशिक्षणार्थींना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली..त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मानवी आहारात अंड्याचे पोषणमूल्य व त्याचे महत्त्व विशद करून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, राज्य राखीव पोलिस दल शाळा येथील विद्यार्थ्यांना व या संस्थेच्या कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना साधारणपणे १ हजार उकडलेली अंडी वाटप करून जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला..Eggs Incubation: अंडी उबवणी केंद्रातील व्यवस्थापनाचे तंत्र.संस्थेचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी दैनंदिन आहारामध्ये अंड्याच्या पोषणतत्वांची माहिती विस्तृतपणे माहिती दिली. दैनंदिन जीवनातील आहारामध्ये अंड्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करून शालेय विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपले आरोग्यरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. .World Egg Day: कोंबडीचे अंडे : आरोग्यासाठी परिपूर्ण खजिना .जागतिक अंडी दिनाच्या निमित्ताने प्रसाद कृष्णाजी भगत, भैरवनाथ हायटेक अग्रो प्रा. लि. मुस्ती, वेकंटराव, बालाजी पोल्ट्री फार्म यांनी पशुसंवर्धन विभागास अंडी उपलब्ध करून दिले. यावेळी सहायक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने, दीनानाथ जमादार, संताजी देशमुख व प्रशांत निकंबे यांनी परिश्रम घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.