Nashik News : निफाड सहकारी साखर कारखान्याची १२७ एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी, कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामग्री विक्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी मंगळवार (ता.२६) रोजी ‘निसाका’ संघर्ष समिती व सभासद, कामगारांतर्फे निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला..निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम यांनी नेतृत्व केले, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. ‘निसाका’ची विक्री रद्द करा, निसाका आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.निफाड कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज थकीत असल्याने हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. मात्र कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे भंगार विक्री झाली. .Niphad Sugar Mill : ‘निसाका’ लुटणाऱ्यांचा पर्दाफाश करणार.विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत सर्वपक्षीय धडक मोर्चात एल्गार पुकारण्यात आला. जळगाव फाट्यापासून या मोर्चाची सुरुवात होऊन शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. तहसील प्रांगणात बोलताना अनिल कदम म्हणाले, की निसाका हा कर्मवीरांच्या त्याग आणि सभासदांच्या कष्टातून उभा राहिला आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे यासाठी कामगार, शेतकऱ्यांनी पोटतिडकीने हा उभा केलेल्य लढा यापुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हा बँक व सरकारला दिला आहे. .मोर्चा जळगाव फाट्यावरून सुरू होऊन तहसील कार्यालय प्रांगणात आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, बी. जी. पाटील, प्रमोद गडाख, धोंडिराम रायते, अर्जुन बोराडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन करत संघर्षांची वज्रमूठ यापुढेही नेण्याचे आवाहन केले..Niphad Sugar Mill : ‘निसाका’चे भंगार विकून कोट्यवधींचा अपहार .मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, काँग्रेसचे दिगंबर गिते, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकूळ गिते, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सोमनाथ गडाख आदीसह निसाका सभासद कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते..शासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनआंदोलनविद्यमान आमदारांनी विक्रीला स्थगिती दिल्याची दिशाभूल केली. रानवड कारखानाही त्यांनी बंद पाडला अशी तोफ डागत निसाकाची सखोल चौकशी करून तो सुरू करावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निसाका व सभासद कामगारांतर्फे मागण्यांचे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे व जिल्हा बँकेचे व्यवस्थापक देवकुटे यांना देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.