Washim News: श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव रविवारी (ता. १५) असून या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करून परस्पर समन्वयाने आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश मृद्् व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी दिले..श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सवाच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजन व व्यवस्थापनाबाबत पोहरादेवी येथील नगारा भवन येथे मंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. .Sant Nivruttinath Maharaj: संत निवृत्तिनाथांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक.त्या वेळी ते बोलत होते.या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते..Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : टाळ-मृदुंगाच्या तालात त्र्यंबकनगरी दुमदुमली.या वेळी मंत्री राठोड यांनी कार्यक्रमस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन नियोजन, उपलब्ध सुविधा व आवश्यक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, दरवर्षी श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या वर्षी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव साधेपणाने व एकाच दिवसासाठी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे धार्मिक व सामाजिक शिस्त पाळत कार्यक्रमाचे स्वरूप साधे ठेवण्यात येईल..बैठकीत भाविकांच्या सुरक्षितता व सोईसुविधांबाबत पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, गर्दी नियंत्रण, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन सेवांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.