बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला मोठे यशया निवडणुकीत महागठबंधनला मोठा धक्का जीविका दीदी योजना ठरली गेमचेंजरनिवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा केले होते १० हजार .Bihar Election 2025: बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला मोठे यश मिळाले आहे. बिहारमधील एकूण २४३ जागांच्या निवडणुकीत एनडीएने बहुमतांचा आकडा पार करत १९७ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. तर जेडीयू ७९ जागांवर आघाडीवर आहे. तर या निवडणुकीत महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या १० हजार रुपयांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जात आहे..महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना महिन्याला दिल्या जाणाऱ्या १,५०० रुपयांमुळे 'महायुती'ला भरघोस यश मिळाले होते. महाराष्ट्रातील 'महायुती'च्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिलांसाठी आर्थिक साहाय्य देणारी योजना राबवून निवडणूक एकतर्फी जिंकली असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. .Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का.जीविका दीदी योजनाबिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी, नितीश कुमार यांच्या सरकारने जीविका दीदी योजनेअंतर्गत राज्यातील १.३ कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले. सप्टेंबरमध्ये नवरात्रीच्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. ज्यामध्ये महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले होते. ३ ऑक्टोबर रोजी २५ लाख नवीन महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाले. या १० हजार रुपयांनी 'एनडीए'च्या विजयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे मानले जात आहे. या योजनेचा एकूण सुमारे दीड कोटी महिलांना लाभ मिळाला..Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू.या योजनेसाठी निवडणुकीच्या आधी म्हणजे, २९ ऑगस्ट २०२५ रोजी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. यावर विरोधकांनी सरकारवर, हा मत खरेदीचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. आता निवडणूक निकालांवरून असे दिसून येते की या योजनेने नितीश कुमार सरकार विरुद्ध निर्माण झालेले सत्ताविरोधी चित्र बदलून टाकले.तसेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे महिलांनी जोरदार स्वागत केले होते. .महिलांचे अधिक मतदानदोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकीत ६६.९१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे यावेळी बिहारमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या मतदानांत पुरुष मतदारांच्या तुलनेत सुमारे ४ लाख ३४ हजार अधिक महिला मतदारांनी मतदान केले. महिलांनी केलेले मतदान ७१.६ टक्के एवढे होते. तर पुरुषांच्या मतदानाचा आकडा ६२.८ टक्के होता. याचाच अर्थ असा की पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण सुमारे १० टक्के अधिक राहिले. पाटणा हा एकमेव जिल्हा असा ठरला की जिथे पुरुषांनी महिलांपेक्षा अधिक मतदान केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.