Pune News: जळगाव जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वेळेवर न मिळाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सर्व कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण करूनही अनेक महिन्यांपासून हप्ता जमा न झाल्याने शेकडो महिलांनी थेट महिला व बालविकास कार्यालयात धडक दिली. “आमचे पैसे कुठे आहेत?” असा सवाल करत महिलांनी घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक महिला अद्याप लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत..जळगावमध्ये एक लाखांहून अधिक महिला अद्याप लाभापासून वंचित…जिल्ह्यात सुमारे १० लाख ५० हजार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र यापैकी एक लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अजूनही एकही हप्ता जमा झालेला नाही. अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली, तरीही पैसे न मिळाल्याने त्या त्रस्त झाल्या आहेत. बँक आणि सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार महिलांनी केली..Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये देणारच; एकनाथ शिंदेंचे साताऱ्यात आश्वासन.तांत्रिक अडचणींचे कारण देत प्रशासनाची सारवासारव…आंदोलनावेळी महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर प्रशासनाने आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावातील फरक, खाते लिंक नसणे किंवा तांत्रिक अडचणी यामुळे पैसे अडकल्याचे सांगितले. मात्र महिलांच्या मते, ही कारणे आधीपासून सांगितली जात असून प्रत्यक्षात समस्या सुटत नाही..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही, 'या' नंबरवर कॉल करा.लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे…घरखर्च आणि सणासुदीसाठी या पैशांवर अवलंबून असलेल्या महिलांचा रोष वाढत गेला. काही महिलांनी “पैसे मिळेपर्यंत आम्ही इथून जाणार नाही,” असा ठाम पवित्रा घेतला. अखेर अधिकाऱ्यांनी लवकरच सर्व त्रुटी दूर करून रक्कम खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले..या घटनेमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, गरजू महिलांना वेळेवर मदत मिळणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.