Water Management: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलकृती पंधरवड्याचे औचित्य साधून, जागतिक महिला शेतकरी दिनानिमित्त सोमवार (ता. २०) रोजी नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा) येथे महिला शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ‘महिला सक्षमीकरणाचा जलप्रवाह’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या उपक्रमात ५५ महिला शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आधुनिक शेती आणि पाणी व्यवस्थापनाचे धडे गिरवले..कार्यशाळेत प्रामुख्याने ‘‘पाणी व्यवस्थापनातून महिला सक्षमीकरण’’ या विषयावर भर देण्यात आला. जलसंपदा विभागामार्फत महिलांसाठी असलेले कायदे, पाण्याचे सूक्ष्म नियोजन, शेतीविषयक शासकीय योजना आणि शेतीपूरक व्यवसायातील नवीन संधी यांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्याचे ‘बाय-प्रॉडक्ट’ तयार करणे आणि जागतिक बाजारपेठेसाठी आयात निर्यात क्षेत्रातील बारकावे या विषयांची सखोल माहिती महिलांना देण्यात आली..Agriculture Workshop: संत्रा बहर व्यवस्थापन,पीक कर्जावर आज चर्चासत्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिकचे कृषी उपसंचालक महेश वेठेकर, स्किल इंडियाचे मेंटॉर श्रीकांत पाटील आणि सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता महेंद्र आमले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आधुनिक शेतीसोबतच उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. जलसंवर्धनातून उत्कृष्ट शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा यावेळी जलसखी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला..Drinking Water Management: धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा : पालकमंत्री देसाई.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मेटा संस्थेचे अधीक्षक अभियंता व संचालक प्रमोद बाविस्कर, वाल्मेटा टीमच्या उपसंचालक व कार्यकारी अभियंता स्नेहलता गावडे, उपविभागीय अभियंता योगेश मोरे आणि कनिष्ठ अभियंता स्वप्नील पगार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले..महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांची शिकण्याची ओढ हे या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले असून, अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.