Gondia News: शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली शेतशिवारात सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई हेमराज सय्याम (वय ५५, रा. माहुली) असे मृत महिलेचे नाव आहे. लक्ष्मीबाईच्या दुर्दैवी मृत्युमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे..मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई सय्याम नेहमीप्रमाणे मक्याच्या शेतात काम करीत होत्या. याचवेळी झुडपामध्ये दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात लक्ष्मीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतातील शेतकरी, मजूर, गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. उल्लेखनीय म्हणजे, परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, तत्काळ पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे..Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार.परिसरात वन्यप्राण्यांची हजेरीचारगाव, बोपाबोडी, सातलवाडा, उकारा, विर्शी शिवरात मागील काही दिवसांपासून वाघ दिसल्याचे चर्चा सुरू आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाले आहे. .Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात जर्सी गायींचा बळी ; येडशी अभयारण्यात वाघाचा धुमाकूळ.सध्या ऊस कापणी सुरू असल्यामुळे उसाची वाडी रिकामी होत आहे. त्यामुळे उसाच्या वाडीत लपलेले वाघ व अन्य प्राणी बाहेर येऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात सगळीकडे ‘वाघ आला रे’ ही चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगत आहे. वन विभागाने यावर ताबडतोब उपाय योजना करावी, अशी मागणी परिसरातील जनतेनी केली आहे..घटनास्थळी चिखल असल्याने पायाच्या कुणा स्पष्ट दिसून येत नाहीत. काही प्रत्यक्षदर्शीनी वाघाला पाहिल्याचे सांगितले जाते. घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हल्ला करणारा वाघ कोणता आहे. याची शाहानिशा करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.-पवन जोंग, उपवनसंरक्षक, गोंदिया..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.