Pulses Production Issue: नव्या वर्षात कडधान्य बाजाराच्या केंद्र सरकारकडून काही धोरणात्मक अपेक्षा आहेत. देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात कडधान्य अभियानाची (मिशन) घोषणा केली होती. पण सरकारच्या धोरण विसंगतीमुळे देशातील कडधान्य उत्पादन वाढण्याऐवजी कमीच झाल्याचे चित्र बघायला मिळाले. सरकारने धोरण बदलल्याशिवाय हे चित्र पालटणार नाही.