डॉ. विवेक संगेकर, डॉ. रवींद्र जाधवहिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर गाईंमध्ये प्रस्तुती होते. गाय गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असते. अशावेळी अतिथंडी आणि इतर तणावपूर्ण घटकांमुळे आहार कमी होतो, त्यामुळे दूध उत्पादन घटते. थंडीच्या काळात दुग्धज्वर, मायांग बाहेर येणे, कितनबाधा, हायपोमॅग्नेसेमिक टीटॅनी यासारखे आजार दिसतात. लक्षणे तपासून वेळेवर उपचार करणे फायदेशीर ठरते. .हिवाळ्यातील थंडीमुळे वातावरणातील गारवा वाढतो. या काळात जनावरांची योग्य काळजी न घेतल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दुधाळ आणि गाभण गाईंमध्ये वातावरणातील कमी तापमानामुळे चयापचयाशी निगडित विविध आजार होतात. थंड वातावरणात गाईच्या शरीरावर ताण येऊन त्या अशक्त होतात आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर गाईंमध्ये प्रस्तुती होते..Cow Health : गाईंमध्ये प्रसूतीनंतरचा ताण .गाय गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असते. अशावेळी अतिथंडी आणि इतर तणावपूर्ण घटकांमुळे आहार कमी होतो, त्यामुळे दूध उत्पादन घटते. थंडीच्या काळात प्रामुख्याने कॅल्शिअम कमतरतेमुळे होणारा दुग्धज्वर, प्रसूतिपूर्व किंवा प्रसूतिपश्चात मायांग बाहेर येणे, आहारातील ऊर्जेच्या कमतरतेमुळे होणारा कितनबाधा, मॅग्नेशिअम कमतरतेमुळे होणारा हायपोमॅग्नेसेमिक टीटॅनी, स्फुरद कमतरतेमुळे होणारा लालमूत्र आजार दिसून येतो. .कारणे हिवाळ्यात कमी तापमान, वातावरणातील थंडपणा आणि गोठ्याचे अपुरे व्यवस्थापन. गाईंच्या शरीरातील ऊर्जेचा अभाव. आहारामध्ये तंतुमय चाऱ्याचा अभाव. गाभण आणि नुकत्याच प्रसूती झालेल्या गाईंमध्ये संतुलित आहाराची कमतरता. कमी तापमान आणि थंड वाऱ्यामुळे उष्णतेची हानी अधिक होते, ज्यामुळे शरीराला उष्णता राखता येत नाही. कमी ऊर्जा आणि प्रथिनयुक्त आहार..Cow Health: गाईंमधील बाह्य परजीवींचे नियंत्रण.वातावरणातील आर्द्रता शरीरातील उष्णतेचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला प्रभावीपणे कार्य करू देत नाही.थंडीमुळे तणावपूर्ण घटकात वाढ.आहारामध्ये मुख्यत्वे कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, जस्त आणि सेलेनियम यासारख्या खनिजांचा अभाव अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव. प्रसूतीनंतर थंड वातावरणामुळे शरीरातील कमी होणारे तापमान. थंड वातावरणात संकरित गाईंमध्ये चयापचयजन्य विकाराचे अधिक असणारे प्रमाण. .लक्षणे शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा खूप कमी. कान, नाक आणि पाय थंड पडतात. भूक कमी होते, रवंथ प्रक्रिया निष्क्रिय होते. अवयवांचे कार्य बिघडते, श्वसनाची गती मंदावते.हृदयाच्या ठोक्याची गती मंदावते, दूध उत्पादन घटते.दुग्धज्वर आजारामध्ये गाईच्या शरीराचे तापमान कमी होते, त्या जमिनीवर बसून राहतात. किटोसिस आजारामुळे (कितनबाधा) बाधित गाई खुराक खात नाही, परंतु तंतुमय चारा खातात; बाधित गाईच्या लघवीला व श्वासाला गोडसर वास येतो. प्रसूतीनंतरच्या हिमोग्लोबिनयुरियामध्ये (लाल मूत्र आजार) प्रामुख्याने गाई-म्हशींमध्ये कॉफीच्या रंगाची लघवी पाहण्यास मिळते. शरीराच्या तापमानात खूप घट झाल्यास गाई कोमात जाऊ शकतात. गंभीर अवस्थेत मृत्यू होण्याचा धोका असतो..Cow Health Kit : काऊ फिट कीट दूध उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरेल ? | ॲग्रोवन.निदानचयापचयजन्य विकार प्रवृत्त करणारे घटक, जसे की वातावरणातील गारवा, थंड वारा आणि गोठ्याचे अपुरे व्यवस्थापन. दुधाळ आणि गाभण संकरित गाईंमध्ये धोका अधिक असणे. विविध आजारांमध्ये आढळणाऱ्या लक्षणाच्या आधारे व रक्त तपासणीद्वारे आजाराचे निदान करण्यास मदत होते. रक्तातील कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम आणि ग्लुकोज तपासणी.यकृत निगडित तपासणी तसेच लघवीची चाचणी.सोनोग्राफीद्वारे गर्भाशय तपासणे. .उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय गाईंना थंडीपासून वाचवण्यासाठी चांगल्या प्रकारच्या गोठ्याचे व्यवस्थापन आवश्यक. गोठ्याला चारीबाजूंनी उबदार पडदे किंवा बारदान बांधल्याने म्हणजे गोठ्यात थंड हवा शिरणार नाही. गोठा उबदार राहण्यास मदत होईल. गाईचे शरीर सौम्यपणे पोत्याने, उबदार कापडाने किंवा ब्लॅंकेटने झाकावे.गाईला सूर्यप्रकाशामध्ये ठेवून त्यांच्या शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत होते. गरजू जनावरांना संध्याकाळच्या वेळी शेकोटी करून आवश्यकता असल्यास तातडीने उब द्यावी.अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या गाईंचे पशुवैद्यकाच्या सल्याने त्वरित उपचार करावेत. .आहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश करावा. जेणेकरून त्या किटोसिससारख्या आजाराला बळी पडणार नाहीत. गाईंच्या आहारामध्ये चाऱ्याबरोबर खनिजक्षार मिश्रणाचा समावेश करावा, जेणेकरून खनिजांची कमतरता होऊन गाई चयापचय विकाराला बळी पडणार नाहीत.गाईंच्या चाऱ्यामध्ये हिरवा आणि कोरडा चारा यांचे संतुलन ठेवावे. चाऱ्यामध्ये अचानक होणारा बदल टाळावा. दुधाळ गाईंना त्यांच्या दूध उत्पादनानुसार आहारामध्ये खुराकाचा समावेश करावा. मुबलक प्रमाणात ऊस वाढे उपलब्ध असतील तरी जनावरांच्या आहारात वाड्यांचा जास्त उपयोग करू नये. पर्यायी चारा उपलब्ध नसल्यास ऊस वाढ्यावर चुन्याच्या निवळीची प्रक्रिया करावी. - डॉ. विवेक संगेकर, ९०७५८८९४९० (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.