पशुपालनसध्या रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होत आहे. आपल्या जनावरांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी त्यांच्या शरीरावर गोणपाटाचे पांघरूण घालावे.शक्यतो जनावरांना बंदिस्त गोठ्यामध्ये ठेवावे. गोठ्याच्या खिडक्या गोणपाटाच्या पडद्यांनी झाकाव्यात. यामुळे थंड वारे आत येण्याचे प्रमाण कमी होऊन गोठ्यात उबदार वातावरण राखले जाते.सध्या शेळ्या विण्याचा हंगाम सुरू आहे. किमान तापमान कमी असल्यामुळे करडांचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. करडे ठेवलेल्या ठिकाणी उबदार वातावरण राखावे. थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी खिडक्यांच्या जाळ्यांवर गोणपाट लावावेत..कुक्कुटपालनसध्या किमान तापमानात खूप घट होत आहे. कोंबड्याचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळेस विजेचे बल्ब लावून उष्णता करावी. थंडीपासून संरक्षणाकरिता भिंतीच्या जाळ्यांचे पडदे ओढून घ्यावेत. असे पडदे नसल्यास गोणपाटाचे पडदे लावावेत.अंड्यावरील कोंबड्याचे (लेअर) संगोपन करण्यासाठी नवीन शेड करणार असल्यास ऊन, वारा व पावसाची दिशा विचारात घेऊन जागा निवडावी. या जागी स्वच्छ, निर्जंतुक खेळती हवा आणि विजेचा पुरवठा होईल, याचा विशेष विचार करावा. अंड्यावरील कोंबड्याचे (लेअर) संगोपन डीप लिटर (गादी पद्धत) अथवा पिंजरा पद्धतीने करता येते..Livestock Care: वाढत्या थंडीमध्ये पशुधनाची काळजी.डीप लिटर पद्धतीमध्ये जमिनीवर ३ ते ५ इंच जाडीचा भुसा, तूस, टरफल इ. साहित्याचे लिटर पसरावे.नवीन पिल्ले आणण्याआधी ब्रुडर तयार करून ठेवावे. ब्रुडरचे तापमान साधारणत: ३० ते ३५ अंश सेल्सिअस इतके असावे. पिल्ले आणल्याबरोबर त्यांना ब्रुडरमध्ये ठेवून पसरट भांड्यामध्ये भरडलेला मका सर्वसाधारण तीन दिवसांपर्यंत द्यावा. पिण्यासाठी पाण्याचे पसरट भांडे ठेवावे.पिल्ले ब्रुडरपासून लांब जाऊ नयेत म्हणून ब्रुडर भोवती ३० ते ४० से.मी. अंतरावर १५ इंच उंचीचे गोलाकार चिकगार्ड ठेवावे. पिल्ले जसजशी मोठी होतील, तसतसे वर्तुळ मोठे करावे..Livestock Care: जनावरांतील ‘ॲस्पिरेशन न्यूमोनिया’ची लक्षणे अन् उपाय.मत्स्यसंवर्धनमाशांना खाद्य देताना सुरुवातीला माशांची वाढ व आकार लक्षात घेतला जातो. लहान आकाराचे खाद्य शरीराच्या वजनाच्या ८ ते १० टक्के दराने द्यावे. जसे मासे मोठे होतील, तसे खाद्याचे प्रमाण वाढवत शरीराच्या वजनाच्या ६%, ४% व २% द्यावे. खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण ३४%, ३२%, २८%, २६%, २४% व २०% या प्रमाणात कमी करावे. त्याच वेळी मत्स्य खाद्य गोळीचा आकार वाढवत जावा. सर्वसाधारणपणे मासा ५० ग्रॅम असेपर्यंत १ मि.मी., १०० ग्रॅम असेपर्यंत २ मि.मी., २५० ग्रॅम असेपर्यंत ३ मि.मी. व नंतर ४ मि.मी. आकाराच्या मत्स्य खाद्य गोळ्या द्याव्यात..खाद्य दिवसातून ४ वेळा विभागून द्यावे. अगदीच शक्य नसल्यास दिवसातून किमान २ वेळा तरी विभागणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.