Jalgaon News: तापी महाकाय पुनर्भरण प्रकल्पासह गिरणा नदीवरील सात बलून बंधारे प्रकल्पांना केंद्रीय प्रायोगिक (पायलट) प्रकल्पांत समाविष्ट केले आहे. २०२४ पासून या प्रकल्पांची फक्त चर्चा आहे. पण केंद्राकडून त्यासाठी निधी मिळालेला नाही. कामही कुठेच सुरू नाही. .केंद्रात केंद्रीय जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील अर्थात चंद्रकांत रघुनाथ पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पिंप्रीअकराऊत (ता.मुक्ताईनगरचे) भूमिपुत्र आहेत. त्यांनी या प्रकल्पांसाठी मोठा निधी देऊन प्रकल्प मार्गी लावावेत, अशी अपेक्षा आहे. सी.आर.पाटील हे अनेक वर्षांपूर्वी गुजरातेत स्थायिक झाले. तेथे पोलिसात ते होते. नंतर भाजपमध्ये सक्रिय झाले. पुढे गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व अन्य पदे त्यांनी भूषविली. जळगावशी त्यांची नाळ कायम आहे..Irrigation Projects: कोल्हापुरातील डोंगर, पायथ्याच्या ओसाड जमिनीत फुलणार शेती.जिल्ह्याचे आणखी एक भूमिपुत्र अर्थात जामनेरचे आमदार गिरीश महाजन हेदेखील राज्यात मध्यंतरी जलसंपदा मंत्री होते. आताही त्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. त्यांनीदेखील या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करावा, असाही मुद्दा चर्चेत आहे..जिल्ह्यात राज्य शासनात तीन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात महाजन, शिंदेसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा समावेश आहे. पाटील हे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री आहेत. तर सावकारे हे वस्त्रोद्योगमंत्री आहेत. केंद्र सरकारमध्येदेखील रावेर लोकसभा क्षेत्रातील खासदार रक्षा खडसे या राज्यमंत्री आहेत. चार मंत्री जिल्ह्यात आहेत. यामुळे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे..Irrigation Projects: सिंचन प्रकल्पांत जलसाठा ८० टक्क्यांवर.तापी नदीवरील अमळनेरातील पाडळसे प्रकल्प (निम्न तापी प्रकल्प) व गिरणा नदीवरील जळगाव जिल्ह्यातील सात बलून बंधाऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पातून कुठलाही निधी मिळालेला नसल्याची स्थिती आहे..पाडळसे व बलून प्रकल्पाचा समावेश केंद्रीय योजनांत व्हावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सतत प्रयत्न करीत आहेत. बलून प्रकल्पास केंद्राने काही वर्षांपूर्वी केंद्रीय प्रायोगिक प्रकल्प म्हणून मंजुरी दिली होती. पाडळसे प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. तर बलून बंधारे प्रकल्पाच्या कामास गिरणा नदीवर सुरवातच झालेली नाही. पाडळसे प्रकल्पाची अधिकारी, मंत्र्यांनी अनेकदा पाहणी केली. लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशासाठी या प्रकल्पाचा मुद्दा अनेकदा प्रचारात आला. मध्यंतरी पाडळसे प्रकल्पाची पूर्ण माहिती जाणून काही सूचनाही राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या होत्या..पाडळसे धरणाला विलंब झाला आहे. कारण त्याचे काम मागील २० ते २२ वर्षे रेंगाळले आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता यावी, पाच सरकारी उपसा सिंचन योजना व दोन सहकारी उपसा योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या सुरू करण्यासाठी केंद्राची मदत लागणार आहे..सरकार भाजपचे, मग अडचण काय?महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांत महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे तापीच्या पाणी वाटपाचा प्रश्न अभ्यास करून व चर्चा करून सोडवला जाऊ शकतो. निम्न तापी पाडळसे प्रकल्प हा जळगाव धुळे जिल्ह्यातील गावांसाठी कायापालट करणारा ठरू शकतो. त्यास मागील वर्षी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. निधी मिळेल व काम गतीने होईल, अशी अपेक्षा होती. पण निधीबाबत अपेक्षाभंग झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.