Latur News: राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा नवीन कार्यक्रम गुरुवारपासून (ता. ४) सुरू होत आहे. पण या नवीन कार्यक्रमानुसार उमेदवारांना आणखी प्रचार करावा लागणार आहे. याकरिता राज्य निवडणूक आयोग खर्चाची मर्यादा वाढवून देणार का, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. .निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होत असतानासुद्धा राज्य निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत खर्चाच्या बाबतीत स्पष्टीकरण दिले नसल्याने राजकीय पक्ष, पदाधिकारी तसेच उमेदवार संभ्रमात आहेत. लातूर जिल्ह्यात निलंगा नगरपालिका व रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रक्रिया होत आहे..Local Boyd Elections: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना सज्ज.खर्च झाला, पुढे कसा करायचा?राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदासाठी खर्चाची मर्यादा १५ लाखांची आहे. तर नगरसेवकपदासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी पाच लाखांपर्यंतच खर्च करता येतो. मतदानाच्या आदल्या दिवशी तर एक दोन दिवस अगोदर राज्य निवडणूक आयोगाने अपील असलेल्या ठिकाणी व न्यायालयाने २२ नोव्हेंबरनंतर दिलेल्या निकालाच्या ठिकाणची निवडणूक स्थगित केली. दरम्यानच्या काळात उमेदवारांचा प्रचारावर मोठा खर्च झाला आहे. आता पुढे पंधरा दिवस कसा खर्च करायचा, झालेला खर्च कसा दाखवायचा हा प्रश्न सध्या उमेदवारांसमोर आहे..Local Body Elections: यंदा १० टक्क्यांनी वाढले मतदान.सुधारित निवडणूक कार्यक्रमजिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : चार डिसेंबरउमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : १० डिसेंबर दुपारी तीनपर्यंतनिवडणूक चिन्ह देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करणे : ११ डिसेंबरमतदानाची तारीख : २० डिसेंबरमतमोजणी व निकाल जाहीर करणे :२१ डिसेंबरशासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे : २३ डिसेंबरपूर्वी .अपिलावर जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर तीन दिवसांत निवडणूक घ्यावी, असे निवडणूक कार्यक्रमात जाहीर केले असते तर हा गोंधळ उडाला नसता. स्थगित झालेला कार्यक्रम आता पुढे सुरू झाला आहे. निवडणुकीचा कार्यकाळ वाढला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवाराला खर्चाची मर्यादा वाढवून दिली पाहिजे.— ॲड. व्यंकट बेद्रे, लातूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.