Cotton Procurement: मुदत संपली तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार
CCI Assures High Court: भारतीय कापूस पणन महामंडळातर्फे (सीसीआय) कापूस विक्रीसाठी दिलेली १६ जानेवारीची मुदत संपली असली, तरी त्या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडून संपूर्ण कापूस खरेदी केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही ‘सीसीआय’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.