Pune News: द्राक्षशेतीसाठी निधी देण्यास अर्थमंत्री म्हणून मी अजिबात आढेवेढे घेणार नाही. तसेच, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यात कृषी सचिवांसोबत तसेच केंद्रीय स्तरावर वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. .महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६५ व्या वार्षिक द्राक्ष अधिवेशन व तीन दिवस चर्चासत्राचे उद््घाटन करताना रविवारी (ता. २४) ते बोलत होते. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार शंकर मांडेकर, कृषी आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक संजयकुमार सिंग, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, चिलीचे शास्त्रज्ञ डॉ. कार्लोस रेयेस फ्लोडी, बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण, कोषाध्यक्ष शिवाजी पवार, संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन व्यासपीठावर होते..Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल.श्री. भरणे म्हणाले, आमच्या वाडवडिलांपासून द्राक्षशेती केली जाते. त्यामुळे मी आधी द्राक्ष बागायतदार आहे. त्यानंतर कृषिमंत्री आहे. द्राक्ष बागायतदार आमचे कुटुंब असून या अधिवेशनात मांडलेल्या समस्या दूर करण्यासाठी मी व्यक्तिशः पाठपुरावा करेल. शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घेण्याकरिता सरकार प्रयत्नशील राहील.’’ श्री. भोसले यांनी द्राक्ष शेतीच्या तपशीलवार समस्या अधिवेशनात मांडल्या. तसेच, संघाच्या द्राक्षवृत्त स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले..वाद नसलेला कृषिमंत्री शोधलाकृषिमंत्र्याबद्दल आधी सारखं काही तरी निघत होतं. त्यामुळे मी ठरवले की असा कृषिमंत्री शोधून काढतो की त्याचं काहीही निघालं नाही पाहिजे (हशा), असा उल्लेख श्री. पवार यांनी नवे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा केला. ‘‘दत्ताभाउंचे सारे कुटुंब शेतीत राबते. ऊस, डाळिंब, केळी, द्राक्षाची प्रयोगशील त्यांची शेती आहे,’’ अशी स्तुती त्यांनी केली..Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार.द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनातील मागण्याद्राक्षासह फळबागांना एआयचा निधी द्या.नव्या वाणांच्या आयातीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा.कुसुम योजनेतून मागेल त्याला सौर वीज जोडणी द्यावी.दहा अश्वशक्तीच्या कृषिपंपधारकाला वीजबिल माफी द्यावी.शेडनेटमधील कापड, रेफरव्हॅनला अनुदान द्यावे.ट्रॅक्टरला फिटनेस प्रमाणपत्राची अट नको..पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा.शीतगृहातील बेदाण्याला १८ टक्के जीएसटी लावू नये.सौर ऊर्जाचलित बेदाणा शीतगृह उभारणीला अनुदान द्यावे.विदेशातून होणारी चोरटी बेदाणा,द्राक्ष आयात थांबवा.डबलड्रीप, मल्चिंग व द्राक्षशेतीतील अवजारांना अनुदान द्यावे.शेतकऱ्याला कर्ज देताना सीबिलची अट रद्द करावी.व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी कायदा करा.उसात टूफोरडी तणनाशक वापरास बंदी आणावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.