Parbhani News: अतिवृष्टी, पूर या सारख्या अस्मानी संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळणार आहे. एकदा शब्द दिला की माघार नाही. हे तत्त्व पुढे घेऊन जाणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. .परभणी येथे बुधवारी (ता. १२) आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, भास्कर लंगोटे, ज्योती वाघमारे, सखूबाई लटपटे आदी उपस्थित होते..Farmer Loan Waiver : शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी; विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून निषेध.श्री. शिंदे म्हणाले, की अतिवृष्टी बाधितांना सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री असताना ‘एनडीआरएफ’चे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली. मदतीची मर्यादा २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत वाढविली. या वेळी सुद्धा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे..Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचा तिढा.‘फेसबुक लाइव्ह’ करून सरकार चालत नाही. ‘फेस टू फेस’ लोकांमध्ये गेल पाहिजे. कोरोनात लोक मरत असताना घरात लपून बसले त्यांना कशाला पाहिजे मुख्यमंत्रिपद. मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या भेटीस आले नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांना श्री. लगावला..उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले...आपल्याला गरीबीची जाणीव आहे. म्हणून अनेक योजना सुरू केल्या.विरोधकांनी कितीही अफवा केल्या तरीही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.परभणीतील उजळंबा येथे ‘एमआयडीसी’ची प्रक्रिया सुरू करून या भागात उद्योग येऊ द्यावेत, अशी सूचना उद्योग मंत्र्यांना करू..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.