Forest Produce: मुरबाड तालुक्यातील डोंगराळ व जंगल परिसरात वारंवार लागणाऱ्या आगींमुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असलेल्या करवंदाच्या झाडांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रानमेवा जळून जात असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे..तालुक्यातील माळशेज घाट, नाणेघाट, टोकावडे, करचोंडे, खापरी, डांगुर्ले, शिवळे, वैशाखरे, प्रधानपाडा, आंबेगाव, पळू, कळमगाव; तसेच जांभूळपाडा, जांभुळ टेपवाडी आदी आदिवासी वाड्या-पाड्यांच्या परिसरात करवंदाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात या झाडांवर येणारी करवंदे हा स्थानिकांसाठी महत्त्वाचा रानमेवा आहे. अनेक कुटुंबे हा मेवा गोळा करून बाजारात विक्री करतात. त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळतो..Forest Fire: तेंदूपत्ता हंगामात नागझिऱ्यात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ.अलीकडे जंगलात लागणाऱ्या आगींमुळे करवंदाची झाडे आणि त्यावरील फळे जळून नष्ट होत आहेत. यामुळे आदिवासींच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. काही ठिकाणी निष्काळजीपणे टाकलेला जळता कचरा, शेकोट्या किंवा गवत जाळण्याच्या घटनांमुळे आग वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे..Heatwave Impact: कडक उन्हामुळे आंब्याला फटका.परिणामी, जंगलातील झाडे, वन्यजीव आणि नैसर्गिक संपत्ती धोक्यात येत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास करवंदासह इतर रानमेवा देणाऱ्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आदिवासींच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..उपाययोजनांची आवश्यकतादरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या आगींमुळे करवंदाची झाडे जळून जातात. करवंद हा आमच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत टोकावडे परिसरातील एका आदिवासी ग्रामस्थाने व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर वनविभागाने जंगल परिसरात नियमित गस्त वाढवावी, आग प्रतिबंधक ‘अग्निरेषा’ तयार कराव्यात; तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.