Amaravati News : जामली वनपरिक्षेत्रांतर्गत येणारे जंगलक्षेत्र सोडून शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान दररोजच होत आहे. त्यामुळे या पिकांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली आहे..जामली वनपरिक्षेत्रांतर्गत १० गावे येतात. यात वस्तापूर, मोझरी, कुलंगना खुर्द, कुलंगना बु., चिचखेडा, जामली, अंबापाटी, गिरगुटी, खोंगडा आदी गावांचा समावेश आहे. या गावांत शेकडो शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. गावालगतच जंगलक्षेत्र असल्याने जंगलातील वन्यप्राणी सध्या वनजमीन क्षेत्रावर उतरले आहेत. .Wild Animal Crop Damage : खानदेशात पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ.अशातच शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून ते उभ्या पिकांचे नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांनी कितीही उपाययोजना केल्या तरी त्याला ते जुमानत नाहीत. शेतात झटका मशीन, बुजगावणे, साडीचे कुंपण, देशी पावट्यांचा आवाज, डिजिटल कुत्र्यांचे भुंकने, असे काही जरी शेतात लावले तरी त्याला न जुमानता पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे..Wild Animal Crop Damage : पाडलोसमध्ये आंबा, काजू, नारळाचे गव्यांकडून नुकसान.वाघाची भीती अन् शेतकऱ्यांचे रात्रीला जागरणएकीकडे जामली वनपरिक्षेत्रात कुलंगना येथील युवक प्रवीण बेलसरे याचा वनखंड क्रमांक ३२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे वन विभागाने १० गावांत दवंडी देऊन दिवसा शेतात तसेच रात्रीला घराबाहेर निघू नये म्हणून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेताची राखण करावी की स्वतःचा जीव वाचवायचा, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत..नुकसानभरपाईसाठी कार्यालयात अर्जजुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत शेतीपीक नुकसानीकरिता २० शेतकऱ्यांनी, पशुधन हानी आठ, मनुष्य हानी एक, किरकोळ जखमी एक आदी नुकसानग्रस्तांनी जामली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत..वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसानभरपाईकरिता अर्ज करावेत. त्यांना त्यांच्या नुकसानाप्रमाणे भरपाई देण्यात येईल.- अर्चना अलोकार, वनपरिक्षेत्र अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.