Agriculture Loss: खानदेशातील केळी, पपई, भाजीपाला तसेच नव्याने पेरणी झालेल्या पिकांमध्ये रानडुकरे, रोही, नीलगायी, हरणे आणि अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. या वन्यप्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत..वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची माहिती वन विभागाला असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती प्रमाणात भरपाई मिळते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ऊस व केळीच्या बागांमध्ये वन्यप्राणी लपून राहत असून अनेकदा शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडतात. दरमहा दोन ते तीन शेतकरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होत असल्याचे सांगितले जाते. मात्र या समस्येवर प्रतिबंधात्मक उपाययोजना अपुऱ्या असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे..WildLife Crop Damage: रानडुकरांकडून शाहूवाडीतील अनेक गावांमध्ये पिकांचे नुकसान.केळी बागांसाठी वाढती डोकेदुखीसध्या केळी पीक वाढीच्या तसेच निसवणीच्या अवस्थेत असून अनेक बागा काढणीच्या टप्प्यात आहेत. अशा बागांमध्ये रानडुकरे पहाटे किंवा मध्यरात्री धुडगूस घालून झाडे पाडत आहेत. झाड कोसळल्यानंतर त्यावरील घडाचे शंभर टक्के नुकसान होते. परिणामी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे..Banana Crop Damage: सातपुड्याच्या पायथ्याच्या केळी बागा जमीनदोस्त.दरम्यान, मका, तूर आणि अन्य खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर त्यामध्येही रानडुकरे व इतर वन्यप्राणी नुकसान करीत आहेत. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ही समस्या तीव्र बनली आहे..वनक्षेत्रालगतच्या भागात नुकसान अधिकसातपुडा परिसरालगतचे रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यांत वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. तसेच सातमाळा पर्वतरांगालगतच्या पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि इतर भागांतही पिकांचे मोठे नुकसान होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी अलीकडेच केलेल्या पेरण्या वन्यप्राण्यांमुळे उद्ध्वस्त झाल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. एकीकडे पावसाची अनिश्चितता तर दुसरीकडे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान, अशा दुहेरी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत..केळीची राखणदारीकेळी पीक सध्या वाढीच्या आणि निसवणीच्या अवस्थेत आहे. रानडुकरांच्या हल्ल्यामुळे झाडे कोसळून घडांचे संपूर्ण नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक उत्पादकांना रात्रभर बागांची राखण करावी लागत असून वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव मोठी डोकेदुखी ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.