Amravati News: चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणामुळे राज्यातच नव्हे तर देशात खळबळ उडाली असताना अमरावती जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षातील ४२ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपल्या किडनी विक्रीस असलेली जाहिरात काढली आहे. मागील चार महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनच देण्यात आलेले नसल्याने त्यांच्यासमोर कुठलाही मार्ग नाही, अशी भावना व्यक्त करीत कर्मचाऱ्यांनी आपल्या किडन्या विक्रीसाठी काढल्या आहेत..केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन, या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालये बांधकाम, शौचमुक्त अभियानासारखे अनेक उपक्रम स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. या योजना राबविणारे कंत्राटी कर्मचारी मात्र वेतनाविना काम करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे..Kidney Sale Case: किडनी विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन.एकतर कंत्राटी आणि त्यातही चार महिने पगार नाही, अशा स्थितीत अनेकांच्या किस्त थकल्या आहेत, अनेकांसमोर आरोग्य आणि शैक्षणिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सप्टेंबरपासून आजवर पगारच निघालेला नसल्याने कंत्राटी कर्मचारी चांगलेच अडचणीतच आले आहे. पगाराबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. अखेर उसनवारीला कंटाळून जिल्ह्यातील ४२ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चक्क आपली किडनी विक्रीला असल्याची जाहिरातच काढली आहे..Kidney Sale Case: किडनी विक्रीप्रकरणी ‘एसआयटी’.विशेष म्हणजे किडनीकरिता कुणी रुग्ण पाहण्याचे आवाहनसुद्धा कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे..स्वच्छ भारत मिशन कक्षातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत आम्ही ग्रामविकासाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे. आता कर्मचाऱ्यांची ही भूमिका पाहून पुन्हा एकदा प्रधान सचिवांना स्मरणपत्र देण्यात येईल.- संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.