White Grub Management Methods: हुमणी कीड किती विध्वंसकारी आहे हे आपण सर्वच जाणतो. या किडीची भुंगेऱ्यांची अवस्था साधारणपणे मे-जून महिन्यात बाहेर येते. परंतु नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे सध्या हुमणीच्या भुंगेऱ्यांसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. इंग्रजीमधील 'प्रीकॉशन इज बेटर दॅन क्यु्अर' या म्हणीप्रमाणे हुमणी किडीच्या नियंत्रणापेक्षा भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन कधीही फायदेशीर ठरते..हुमणी किडीची अंडी, अळी कोष या तीन अवस्था जमिनीमध्ये असतात तर प्रौढ भुंगेरे ही अवस्था जमिनीवर म्हणजेच झाडांवर आढळते. मादी भुंगेरे एकेरी पद्धतीने ओलसर जमिनीत ७ ते १२ सेंमी खोलीवर अंडी घालतात. ही अंडी साबुदाण्यासारखी लांबट आणि गोल असतात. त्यामुळे भुंगेऱ्यांचे नियंत्रण करणे म्हणजे पुढील पिढीवर आळा घालण्यासारखे आहे. तसेच भुंगेरे जमिनीच्या वर असल्याने त्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते..Humani Pest Control: हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांचे नियंत्रण.पोषक हवामानसध्या भुंगेरे बाहेर येण्यासाठी पोषक वातावरण आहे असे म्हणतो. म्हणजेच जमिनीत ओलावा, जमिनीचे तापमान आणि पाऊस सध्या या तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये सांगड घालत आहेत. जसे, पावसानंतर जमिनीतील ओलावा वाढतो, तसेच जमिनीचे तापमान वाढल्याने भुंगेरे बाहेर पडतात..भुंगेऱ्यांवरील उपायहुमणीचे भुंगेरे सायंकाळी ७ नंतर शेताजवळीच्या निंब, बोर, पेरू, बदाम, जांभूळ, बाभूळ, उंबर व इतर वनस्पतींवर राहतात. या झाडांवर भुंगेरे दिसू लागताच झाडाखाली एक प्रकाश सापळा एकरी १ या प्रमाणे लावावा. प्रकाश सापळ्यात अडकलेले भुंगेरे डिझेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. किंवा.हुमणीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करण्याचे धोरण राबविणार.कडुनिंब सारख्या झाडाखाली विजेचा बल्ब लावून त्याखाली पसरट भांडे ठेवून किंवा वाफा बनवून त्यात रॉकेल मिसळलेले पाणी टाकावे. विजेच्या प्रकाशाकडे भुंगेरे आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात. ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी सामूहिकपणे केल्यास भुंगेऱ्यांचे उत्तम नियोजन होते.यासोबत प्रकाश सापळ्याशेजारी कामगंध सापळे एकरी ४ प्रमाणे वापरून त्यात हुमणीचा ल्यूर वापरावा. यामुळे भुंगेऱ्यांचा प्रभावी बंदोबस्त होतो..एरंडीच्या बियांचा सापळाएरंडी बियांचा सापळा भुंगेऱ्यासाठी प्रभावी सापळा ठरतो. यातील मिश्रणाकडे भुंगेरे आकर्षित होतात आणि मरुन जातात. एरंडी बिया १ किलो (बारीक), यीस्ट पावडर ५० ग्रॅम, बेसन पीठ ५० ग्रॅम, ताक अर्धा लिटर हे सर्व मिश्रण २ लिटर पाण्यामध्ये भिजवून २ ते ३ दिवस आंबवून घ्यावे. तयार मिश्रणाची ५ लिटर क्षमतेचे मातीचे मडके एकरी ५ मडकी या प्रमाणे मातीमध्ये ठेवावे. याकडे भुंगे आकर्षित होतात.अशाप्रकारे पाऊस पडल्यावर आणि पोषक वातावरण तयार झाल्यावर भुंगेऱ्यांचे नियंत्रण करण्यासाठी घाई करावी. याशिवाय हुमणीच्या नियंत्रणासाठी खरिपातील पेरण्या करतानाच योग्य जैविक आणि रासायनिक फवारण्या कराव्या. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.