Fardad Kapashi: कापसाची वेचणी पूर्ण होऊन त्याची खरेदी विक्री बाजारात चालू आहे. पण बऱ्याचदा शेतकरी फरदड कपाशीचेही उत्पादन घेतात. फरदड कपाशीमुळे तात्पुरते उत्पादन मिळू शकते, मात्र त्यामुळे शेतामध्ये कीड रोगांचा प्रादु्र्भाव जास्त होतो. त्यामुळे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटते. परिणामी कपाशीचा खर्चही वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कपाशीचे उत्पादन घेण्याच्या मागे पडू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात..बीटी कापसावर प्रतिकारशक्ती वाढण्याचा धोकाकापसाची फरदड घेतल्यास बी.टी. कापसामध्ये बोंड अळ्यांना बीटी प्रथिनांची सवय लागते. त्यामुळे हळूहळू या अळ्यांमध्ये बीटी प्रथिनांविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होते. सध्या अनेक भागांत बीटी कापसावरही बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे, त्यामुळे किड नियंत्रण अधिक अवघड बनत आहे..Cotton Farmers: घोटाळा दडपण्यासाठी प्रयोगशाळांचा वापर.कापसाची प्रत व दर्जाफरदड कपाशीवर येणाऱ्या बोंडांना पुरेसे पोषण मिळत नाही. यामुळे धाग्याची लांबी कमी होते, धाग्याची मजबुती घटते आणि रुईचा उतारा कमी मिळतो. परिणामी कापसाची गुणवत्ता घसरते आणि अशा कापसाला बाजारात कमी भाव मिळतो..कीड व रोगांचा प्रादुर्भावफरदड घेतल्यामुळे कापूस पीक जास्त काळ शेतात राहते. त्यामुळे किडी आणि रोगांना पोषक वातावरण तयार होते. यामुळे पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो..हंगामानंतरही कीड संपत नाहीहंगाम संपल्यानंतरही फरदड कपाशीवर अळ्यांना अन्न मिळत राहते. यामुळे शेंदरी व हिरवी बोंड अळी यांच्या पुढील पिढ्या वाढतात आणि पुढील हंगामात या किडींचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढते..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ खरेदी केंद्रांत शेतकऱ्यांना हमालीचा भुर्दंड.बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होतेकापूस पीक जितका जास्त काळ शेतात राहतो तितके त्यातील बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होत जाते. बोंड अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक असलेली किमान पातळी कमी झाल्यास बीटी कापसाचा फायदा कमी होतो..सिंचन व खर्च वाढतोफरदड कपाशीला नियमित पाण्याची गरज भासते. त्यामुळे सिंचनाचा खर्च वाढतो. त्याचबरोबर खरीप हंगामात मावा नियंत्रणासाठी निओनिकोटिनॉईड वर्गातील कीटकनाशकांचा वारंवार वापर झाल्याने त्यांची परिणामकारकता कमी होत आहे, याचा फटका फरदड कपाशीला बसतो.पिठ्या ढेकूण व पांढरी माशीचा धोकाजर खरीप हंगामात पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव असेल तर फरदड कपाशीमध्ये तिचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. तसेच हंगामाच्या शेवटी पांढरी माशी वाढते. फरदड घेतल्यास या किडींचे प्रमाण वाढून पुढील हंगामात त्यांचा प्रादुर्भाव लवकर सुरू होतो..जमिनीतून रोगांचा प्रसारफरदड कपाशीमुळे जमिनीत फ्युजेरियम मर, व्हर्टिसिलियम मर, मूळ सडणे यांसारख्या मृदाजन्य बुरशीजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. याचा परिणाम पुढील पिकांच्या आरोग्यावरही होतो.खर्च व श्रम वाढतातफरदड कपाशी काढताना जमीन कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटण्यासाठी अधिक मजूर, वेळ, श्रम आणि खर्च करावा लागतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.