Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी पुढे येत असून, काही मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार, याची उत्सुकता मतदारांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.
Maharashtra Election
Maharashtra ElectionAgrowon
Published on
Updated on

Latur News : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी पुढे येत असून, काही मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार, याची उत्सुकता मतदारांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.

लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघाचा अपवाद सोडला तर पाच मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली असून, धाराशिव जिल्ह्यातही सर्वच मतदारसंघात मतदानात वाढ झाली आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर तर कोण्याच्या मुळावर पडणार, हे मतमोजणीनंतरच दिसून येणार आहे.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात बुधवारी उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६६.९१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. २०१९ मध्ये ही टक्केवारी ६२.३३ होती. जिल्ह्यातील सर्व २ हजार १४३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजताच मतदानाला सुरुवात झाली.

अनेक मतदान केंद्रांवर सकाळी ७ पासूनच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, प्रतीक्षा कक्ष किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

तसेच मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी मंडप उभारण्यात आला होता. जिल्ह्यातील १ हजार २२७ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग करण्यात आले. याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत होते.

धाराशिव जिल्ह्यात सायंकाळी सहापर्यंत ६४.२७ टक्के मतदान झाले होते. यात धाराशिव मतदारसंघात ६३.७५ टक्के, परांडा - ६४.८०, तुळजापूर - ६६.८९ व उमरगा मतदारसंघात ६१.१५ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत परांडा, धाराशिव, उमरगा व तुळजापूर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com