Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Maharashtra Election 2024 : पलूस-कडेगाव मतदार संघात सर्वाधिक ७९.०२ टक्के तर सांगली मतदार संघात सर्वांत कमी ६३.११ टक्के मतदान नोंदवले गेले.
 Voting Update
Voting UpdateAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी ७१.५७ टक्के मतदान झाले. पलूस-कडेगाव मतदार संघात सर्वाधिक ७९.०२ टक्के तर सांगली मतदार संघात सर्वांत कमी ६३.११ टक्के मतदान नोंदवले गेले.

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांत वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार, याची उत्सुकता मतदारांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार हे मतमोजणीनंतरच समजू शकणार आहे.

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांत बुधवारी (ता. २०) काही ठिकाणी बाचाबाचीचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मुळात जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघांत एकतर्फी वाटणारी निवडणूक नेत्यांच्या सभा व राजकीय डावपेचाने चुरशीची झाली आहे. सांगली जिल्हा हा राजकीयदृष्‍ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो.

 Voting Update
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

मातब्बर नेत्यांना ही निवडणूक सोपी जाईल, असे चित्र होते. मात्र, बंडखोरीमुळे ही निवडणूक चुरशीची झाली. सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, जत, आणि खानापूर मतदार संघांतही धक्कादायक निकाल लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आटपाडी, सांगली या दोन मतदार संघांत बंडखोरी झाली.

त्यामुळे या दोन्ही मतदार संघांत बंडखोरीमुळे निवडणुकीतील सर्व गणिते बिघडली असल्याची चर्चा होऊ लागली आहे. सांगली विधानसभा मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाले आहे. तर पलूस-कडेगाव या मतदार संघात सर्वाधिक मतदान झाले आहे.

 Voting Update
Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

सांगली, शिराळा, जत, तासगाव-कवठेमहांकाळ या चार ठिकाणी प्रचारात आणि मतदान खेचण्यात टोकाची चुरस झाली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला. इस्लामपूर, पलूस-कडेगावमध्ये मातब्बरांसमोर विरोधकांनी जोरदार लढत उभी करत रंगत आणली. मिरज आणि खानापूर मतदार संघांत करंट-अंडरकरंटची चर्चा रंगली.

जिल्ह्यात विधासनभा २०१९ ला ६६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ७१.५७ टक्के मतदान झाले आहे. यंदा ५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. दरम्यान, यापूर्वीच्या निवडणुकीचा निकाल पाहता, ज्या वेळी मतांची टक्केवारी वाढते, त्या वेळी तो प्रस्थापितांविरोधात निकाल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या वेळी वाढलेल्या मतांच्या टक्केवारीत किती कोणाला धक्का बसणार याविषयी उत्सुकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com