Valhe News: सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी थोडासा सावरतो न सावरतो, तोच हुमणीच्या वाढत्या प्रादुर्भावाने उसासह खरीप पिकांवर मोठे संकट कोसळले आहे. सध्या वाल्हे परिसरासह जेऊर, मांडकी, सुकलवाडी या भागांमध्ये हुमणीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पोखरली जात आहेत. विविध कीटकनाशकांसह औषधांची फवारणी करूनही हुमणी किडीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे..मुबलक पाण्याची उपलब्धता व हमीभावामुळे परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. मात्र, या किडीने उसाच्या मुळ्यांवर हल्ला केल्यामुळे वरून हिरवेगार दिसणारे ऊस आतील बाजूने पूर्णतः सुकू लागले आहेत. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे..White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे.शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करूनही हुमणी किडीवर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे ही कीड अधिकच आक्रमक होत आहे. अनेक शेतकऱ्यांना शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक हातचं जाईल की काय? अशी चिंता सतावू लागली आहे. हुमणी नियंत्रणासाठी प्रभावी फवारणी औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे..White Grub Control: हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी हे ८ उपाय कराच!.हुमणी किडीच्या प्रादुर्भावाबाबत प्रत्यक्षात शेतीचा आढावा घेतला असता हुमणीने गंभीर स्थिती आणल्याचेही ऊस उत्पादक शेतकरी गणेश भुजबळ, सुशांत भुजबळ यांनी सांगितले. पन्नास टक्के पेरण्यास झालेल्या नाहीत. उर्वरित पेरण्या करण्यासाठी शेतकरी प्रयत्नात असताना हुमणीने डोके वर काढल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत..कृषी विभागावर नाराजीहुमणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून वेळेवर योग्य मार्गदर्शन आणि उपाययोजना मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. हुमणीने उभी पीक नष्ट होत असताना कृषी विभागाच्या गप्प बसण्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.