Agriculture Subsidy: अनुदानासाठी ३० हजार कोटी कोठून आणायचे?
Finance Department Issue: निधी उपलब्ध नसतानाही विविध योजनांमधील ४२ लाख अर्जांची निवड अनुदान वाटपासाठी केल्यामुळे आता थेट वित्त खात्याचीच कोंडी झाली आहे. अनुदान देण्याकरिता तब्बल ३० हजार कोटी रुपये कसे गोळा करायचे असा पेच तयार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.