आबाजी ऊर्फ मिलिंद रंगराव पाटीलIndian Agriculture Life: सुख मानणे, सुख शोधणे, सुख घेणे अथवा सुख भोगणे या सगळ्या गोष्टी खरं तर मनाचे खेळ आहेत आणि ते तेवढेच व्यक्तीसापेक्ष आहेत. हे कित्येक प्रयोगाअंती सिद्ध झालेलं सत्य आहे. पण शेती करताना मात्र ते प्रत्येक प्रयोगात तथाकथित भुकेचा, गरजेचा नी परिश्रमाचा कस बघणारे असते एवढं निश्चित. काय हवं आहे आणि का हवं आहे एवढं नक्की माहीत असलं की मिळवणं सोपं होतं..शेती तर हे नेहमीच सिद्ध करत असते, बजावत असते की तुमच्या अमर्याद वखवखीला पुरेल एवढा प्रचंड पैसा तुम्हाला माझ्याकडून कधीच मिळणार नाहीये. पण त्याच्या बदल्यात मी तुमच्याकरिता इतर काही काही गोष्टीतले अनमोल आनंद ठेवलेले आहेत; जे तुम्हाला पैसे मोजूनही कुठे नाही मिळणार. पण त्यांचं मेन्यू कार्ड मात्र ती दाखवत नाही. ती सुखं तुमची तुम्ही ओळखायची असतात..मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कृत्तिका नक्षत्रापासून सुरू झालेला पाऊस आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आलं, तरी अद्याप सलग सुरूच आहे.. या पावसाळ्यात गेले चार महिने झाले, माझ्या गावाला सूर्यदर्शन नाही. अतिपावसाने पिकं काळी पिवळी पडली आहेत, घरांची छपरं, पायवाटा, झाडांचे बुंधे गर्द हिरव्यागार शेवाळाने लपेटलेत. गावाच्या तिन्ही दिशांना वळसा घालून वाहणाऱ्या माझ्या जांभळी नदीवरचा पूल या वर्षी कितीदा तरी पाण्याखाली गेला. या चिमुरड्या नदीने अख्खं गाव बरोब्बर दहा वेळा स्थानबद्ध केलं..Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती.समुद्रावरून निघून सह्याद्री चढून आल्यावर पर्जन्यराजाची पुढे जाता जाता घाटमाथ्यावर थोडा थांबा घ्यायची नैसर्गिक परंपरा आहे. म्हणून बाकी कुठं नसला तरी इथे आमच्या भागावर सतत पाऊस असतो. गावातला खारकेसारखा वाळलेला नव्वदीपार झालेला दत्तू म्हातारा अचंबित होवून म्हणतोय, ‘‘काय आजाबच झालंया म्हनायचं औंदा ... माज्या हुब्या ध्याईत म्या कातवाडा पास्नं समदी नक्षतर लागल्याली कद्दीच बगीतली न्हाईती बाबा... आदीमदी एकांडा तरी भांगा आसायचा ओ... पर औंदा ह्यो पावूस हाया म्हनायचा का राकूस?.याक नक्षतर माघार घ्याला तयार न्हाई? समदी नुसती हामरीतुमरीला आल्याती येकामेकावर.’’ ही मात्र वस्तुस्थितीच आहे. घाटमाथ्यावर फार फार तर रोहिणी नक्षत्रापासून म्हणजे २४ / २५ मेपासून सुरू होणारा पाऊस यंदा चक्क १० मेपासून सुरूच आहे. एरवी कधी अवकाळीमुळे, कधी पावसाच्या दडीमुळे तर कधी अति पर्जन्यमानामुळे यंदा शेतीभातीचं कसं होणार? हा पावसाळ्याबरोबर सगळ्यांच्याच मनात नेमेची येणारा यक्षप्रश्न असतो. तो यंदाही मनात आहेच आणि प्रत्यक्षात याच क्षणी मी लिहायला बसलो आहे- ‘शेतीतल्या सुखा’चा निबंध..लाक्षणिक अर्थाने हे लिहिताना विरोधाभासाचा अडथळा असायला हवाय ना मनात? कारण नाही म्हटलं तरी पावसाळ्यात मनोवस्था धास्तावलेली असतेच. पाणी तर पुलाखालून नेहमीच वाहत असतं पण इथे तर दरवर्षी पाणी सर्वार्थाने पुलावरून पण बरंच वाहतंय. मी पाहतोय ते. अठरा वर्षे झाली अनुभवतोय.. तरी पण मनातल्या या परस्पर विरोधी कल्लोळात आतला जाणता विवेक मात्र पूर्णतः नो कॉमेंट मोडमध्ये आहे. मुळात नकारात्मक, निराशघंटा वाजवायला आजकाल तो तयारच नसतो. त्याचं म्हणणं एकच - धाकधुक काय येते नी जाते रे..! हा काय अंतिम संघर्ष नाही. अजून बरेच पावसाळे येणार आहेत. तू तुझं काम केलंयस न्हवं? तवा आता गप बस. पिकवून तुझ्या पदरात किती द्यायचं हे ठरलेलं आहे. एकूणच उद्गारांच्या कोलाहलात प्रश्नचिन्हांचं ट्रॅफिक मात्र तात्पुरतं जाम होतंच असतं अधून मधून. असते एखादी रात्र घनघोर चिंतेची. चालायचंच..!.Farmer Success Story : व्यावसायिक वृत्ती जोपासून मिळवली समृद्धी.पण त्याच तुंबलेल्या गर्दीने भरलेल्या मनाच्या एका कोपऱ्यात हातात काठीला बांधलेल्या शुभ्र तगडी पुठ्ठ्यावर आपल्या अनुभवजन्य सिद्धांताचा फलक घेऊन अमेरिकी तत्त्ववेत्ता हेन्री डेव्हीड थोरो दिलाशाचं मंद हसू घेऊन उभाच असतो. त्या बोर्डवर त्याने आत्मविश्वासाने लिहिलंय - ‘निसर्ग मानवाला त्याच्या गरजेपुरतं सर्व काही पुरवत असतो, आत्मज्ञान आणि स्वातंत्र्यसुद्धा..!’ अंगवळणी पडलेल्या अस्वस्थ विचारांच्या गर्दीतून वाट काढता काढता थोरोचा तो फलक माझं लक्ष नेहमीच वेधून घेत असतो. त्यातल्या आत्मज्ञान या शब्दाभोवतीचा माझा पिंगा आजही सुरूच आहे. निसर्गाशी जमवून घेण्याची आणि एकरूप होण्याची प्रेरणा डार्विननंतर थोरोनेच तर जगाला शिकवलीय ना...?.सुख मानणे, सुख शोधणे, सुख घेणे अथवा सुख भोगणे या सगळ्या गोष्टी खरं तर मनाचे खेळ आहेत आणि ते तेवढेच व्यक्ती सापेक्ष आहेत. हे कित्येक प्रयोगाअंती सिद्ध झालेलं सत्य आहे. पण शेती करताना मात्र ते प्रत्येक प्रयोगात तथाकथित भुकेचा, गरजेचा नी परिश्रमाचा कस बघणारे असते एवढं निश्चित. काय हवं आहे आणि का हवं आहे एवढं नक्की माहीत असलं की मिळवणं सोपं होतं. शेती तर हे नेहमीच सिध्द करत असते, बजावत असते, की तुमच्या अमर्याद वखवखीला पुरेल एवढा प्रचंड पैसा तुम्हाला माझ्याकडून कधीच मिळणार नाहीये. पण त्याच्या बदल्यात मी तुमच्या करिता इतर काही काही गोष्टीतले अनमोल आनंद ठेवलेले आहेत; जे तुम्हाला पैसे मोजूनही कुठे नाही मिळणार..पण त्यांचं मेन्यूकार्ड मात्र ती दाखवत नाही. ती सुखं तुमची तुम्ही ओळखायची असतात. हा तिचा एकदम रोखठोक बाणेदारपणा असतो. तिचं इतकं सगळं आखीव रेखीव करारी धोरण असूनही या देशाच्या धरतीवर संख्येने मातीत राबणारी तिची आम्ही शेतकरी लेकरंच जास्त का आहोत? तमाम अडचणीतूनही आम्ही विनाखंड शेती का कसतोच आहोत? एकीकडे प्रचंड काबाडकष्ट आहेत आणि अनपेक्षित अपेक्षाभंग सुद्धा आहेत. बेभरवशाचं पर्जन्यमान आहे. तरीही..? म्हणजे आम्ही वेडे पीर आहोत का? आम्ही झोंड आहोत का? की आम्ही दुनियेतल्या इतर कुठल्या कष्टप्रद अथवा बुद्धिजीवी कामात कुचकामी आहोत ?.शेतीतून पोटापुरतीच मिळकत असते, हे निर्विवाद सत्य आहेच. आणि जरी खर्चायचे म्हटलं तरी गावागाड्यात भौतिक सुविधांचा अभाव नेहमीच असतो. पिकाची लावण असो अथवा लाण (सुगी) असो शेतीकामांची धांदल चालली असताना हवेत हात हालवून अथवा हाक मारून चहा मागवायला ती टपरी तरी कशी असेल शेताजवळ? दिवसभर घरदार शेतात राबून थकून संध्याकाळी घरात आल्यावर सुद्धा चूल फुंकून स्वयंपाक बनवूनच जेवणं क्रमप्राप्त असतं. कारण कितीही दमून भागून आलं तरी आयतं जेवायला हॉटेल किंवा खासगी पार्सल सर्व्हिसकडे ऑर्डर मागवून खाणं परवडणारं नसतं. अर्थात, काम पण एवढं मरणाचं झालेलं असतं की तीस रुपयाला एक अशा किती बटर रोट्या एका माणसाला लागतील याचा अंदाज न करणंच बरं..ताटभर भात खाणाऱ्यांचं प्लेटभर भाताने कसं भागणार? अर्थात, पैसे टाकले की शिजवण्याच्या श्रमाचा शॉर्टकट करून घेता येणारी ऐपत परिस्थितीच्या कह्यात नसली तरी अस्सल सुखाच्या क्षणांचे पर्याय इथे कमी नाहीत. ज्यातल्या आनंदाला तुलना नसते असे खणखणीत सोहळे इथे नेहमीच होतात. दिवसभर अंग मोडून राबल्यावर जेव्हा रात्री खळ्यावरच्या हलक्या गारठ्यात श्रमपरिहाराचं गरम गरम जेवण अंगत पंगत करून जेवतानाचे क्षण हे बावन्नकशी सुखाचं प्रतीकच असतात. या आनंदांची श्रीमंती कशात मोजायची? म्हणजे पैसा, सुविधा कमी आहेत म्हणून त्याचा वैताग आयुष्यावर नाही. आहे यात आनंद हे सूत्र. कारण सापंत्तिक स्थितीवर इथल्या सुखाच्या कल्पनांचा संबंध मुळात अवलंबूनच नसतो. बऱ्याच बाजू निसर्ग भरून काढतो.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.