Ahilyanagar News: ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजना राबवली जात आहे. मात्र अजूनही योजना पूर्ण झाल्या नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही लोकांना पाणी मिळत नसेल तर पाणी मिळणार कधी, असा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील खासदारांनी दिशा समितीच्या बैठकीत व्यक्त केला..अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २३) दिशा समितीची बैठक झाली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नीलेश लंके यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मंजुश्री ठोकळ यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून जलजीवन पाणी योजना सुरू केल्या..Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले .जिल्ह्यात ९४२ पाणी योजना सुरू झाल्या. मात्र, अवघ्या २८० योजना पूर्ण झाल्या असून, ६६२ योजना रखडल्या आहेत. योजनेतील बदलांमुळे पुनर्मंजुरीसाठी ५५६ योजनांचे प्रस्ताव पाठवले आहेत. जीएसटीमध्ये झालेली वाढ व निधी नसल्याने ठेकेदारांनी काम थांबविल्याचे वास्तव समोर आले आहे..जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले की, जलजीवन मिशनच्या २७४ योजना पूर्ण झाल्या आहेत. काही गावांनी योजनेत नवीन वाडी-वस्त्यांचा समावेश, वाढीव पाणी टाकीची मागणी केल्याने २४० या योजना फेरमंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविल्या आहेत. त्यातील १५० योजनांना मान्यता मिळाली..Jal Jeevan Mission: ‘जल जीवन मिशन’ची ३१५ कामे पूर्ण ४०० कामे प्रगतिपथावर .केंद्र शासनाने योजनेच्या साहित्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे. निधी नसल्याने ठेकेदारांनी कामाची गती संथ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अहिल्यानगर कार्यालयांतर्गत ५७ योजना आहेत. यापैकी केवळ एक योजना पूर्ण झाली आहे. उर्वरित अपूर्ण आहेत. संगमनेर कार्यालयांतर्गत ५५ योजना सुरू आहेत. त्यापैकी ५ योजना कार्यान्वित आहेत. ५० योजना अपूर्ण आहेत. या योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला..खासदार लंके यांनी योजनेच्या दर्जा चांगला राखा. ज्या योजनेबाबत तक्रारी येतील, त्याची चौकशी करण्याची मागणी लंके यांनी केली. दरम्यान जलजीवन योजना पूर्ण करून त्यातून लोकांना पाणी देण्याचा तसेच तक्रारी आल्यास त्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे श्री. भंडारी यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.