विकास गोडगेगावात रेशनला मिळणाऱ्या धान्यासाठी गर्दी होत असते. पीकविमा काहीका असेना हजार दोन हजार, त्याची लोक वाट बघत असतात. किंवा धाकट्या बहिणीचे पैसे कधी जमा होणार आहेत याची चौकशी करत असतात. तरीपण मोबाईलसाठी, टीव्हीसाठी किंवा घरातील छोट्या छोट्या वस्तूंसाठी मोबाईल वरून कर्ज काढतात. चार आणि पाच हजार रुपये वसुलीसाठी बँकेचे वसुली अधिकारी गावोगाव फिरताना दिसतात. चार-पाच किंवा दहा एकर कोरडवाहूमध्ये वार्षिक उत्पन्न ते किती मिळते! एकरी वीस हजार धरले आणि त्यातून त्यांची गुंतवणूक वजा केली तर एकरी पाच हजार पण शिल्लक राहत नाहीत. एकविसाव्या शतकात या संपूर्ण ग्रामीण समाजाला कुठे स्थान असणार आहे?.पुण्याहून गावाकडे जाताना वाटतं सगळी गावं आता आपली जागा सोडून हायवेच्या कडेला येऊन बसली आहेत. शंभर किलोमीटर, दीडशे किलोमीटर... अगदी शहरातून बाहेर पडलो आहोत असं वाटतच नाही. हायवेच्या कडेने इथूनतिथून फक्त हॉटेल्स आणि हॉटेल्स. लोक इतकं खात असतील का? या सगळ्या हॉटेल्सना तेवढं गिऱ्हाईक भेटत असेल का? त्यातील निम्मे हॉटेल्स बंद पडलेल्या अवस्थेत असतात तर काही हॉटेल्स अगदी किल्ल्यासारखी बनवली आहेत. तिथे शहरातील जरा जास्त कमावणारी आणि पुढच्या ईएमआयच्या काळजीत आपली पाश्चात्त्य जीवनशैली जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी लोकसंख्या जेवणाचा आनंद घेताना दिसते. ऐंशी रुपयाचा पापड जेवणाआधी परवडणारी अशी किती लोकसंख्या आहे भारतात?.Rural India: रंगीत आयुष्य कधीच नसतंय बळीराजाचं.गावात पोचतो. गाव रिकामं असतं. गावात, गल्लीत फक्त एकदोन तरुण असतात, ते पण राजकारणात सक्रिय असतात. राजकारणात सक्रिय असतात म्हणून गावात दिसत असावेत. ते पारंपारिक शेतकऱ्यासारखे दिसत नाहीत पण शेती करत असतात. आता शेती करण्यासाठी पारंपारिक शेतकऱ्यासारखं दिसण्याची गरज नाही. शेती करण्यासाठी बैलांची गरज नाही, बैलगाडीची गरज नाही, खांद्यावर फवारा घेऊन तूर, कपाशी फवारण्याची गरज नाही किंवा बैलगाडीत फवारा ठेवून फवारण्याची गरज नाही. आता ड्रोनने तुरीची, कापसाची फवारणी होते, ट्रॅक्टरने कोळपणी, पेरणी, सगळ्या गोष्टी होतात. .एक तरुण ट्रॅक्टरच्या साहाय्याने एका दिवसात शंभर पेक्षा जास्त लोकांची आणि बैलांची कामं करतो. काही वर्षांनी गोवंश संपला म्हणून लोक कुणाला दोष देत असतील त्यावर चर्चा होऊ शकते. काही कामे आहेत जी अजून ट्रॅक्टरने होऊ शकत नाहीत, ती कामं मजूर बायका करतात. कारण परंपरेने ती कामं पुरुषांची नव्हती. आपण असे म्हणू शकतो की शेतीची पुरुषांची कामे मशिन करू लागल्या आहेत पण स्त्रियांची कामे अजून स्त्रियाच करतात. म्हणून अजूनही गावाकडे स्त्रियांचा शेतीतील रोजगार टिकून आहे..Rural India : तुला ठेवितो कोरून .गावातील मुली घरी बसून असतात. लग्नासाठी अजून चांगले, अजून चांगले स्थळ येईल म्हणून वाट बघत असतात. स्थळ साधारण शेतीवर अवलंबून असलेले आले तर ‘आमच्या मुलीला अजून शिकवायचे आहे’ म्हणतात. मुलीचा बाप काहीच बोलत नाही. मुलीची आई रानात जाऊन काम करत असते. घरची दोन चार एकर शेती असते, त्यावर भागत असतं. मुलीचा भाऊ तीसेक वर्ष होऊन गेलेला असतो, पण त्याचे लग्न जमत नसते. .त्याला पण इतर मुलींच्याकडून तशीच उत्तरं येत असतात. काही मुलांना तर स्थळ यायचे पण बंद झालेले असते. ही मुलं गावात दिवाळीत किंवा इतर सणासुदीला दिसतात. त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील दुःख बघवत नाही. यातील काही मुलं तालुक्याला काहीतरी काम करीत असतात. काहीजण पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरला जगत असतात. लग्नाच्या बाजारात योग्य उठाव येण्यासाठी आवश्यक स्वतःचं घर किंवा शहरात फ्लॅट, दहा एकर शेत जमीन त्याच्याकडे नसते म्हणून ते अजून कष्ट करत असतात. पण तेवढ्यात तिशी ओलांडलेली आहे, याचा पण त्यांना अंदाज आलेला असतो..Rural India : या बदलाच्या चक्रात काय काय बदललं ? | ॲग्रोवन.गावात रेशनला मिळणाऱ्या धान्यासाठी गर्दी होत असते. पीकविमा काहीका असेना हजार दोन हजार, त्याची लोक वाट बघत असतात. किंवा धाकट्या बहिणीचे पैसे कधी जमा होणार आहेत याची चौकशी करत असतात. तरीपण मोबाईलसाठी, टीव्हीसाठी किंवा घरातील छोट्या छोट्या वस्तूंसाठी मोबाईल वरून कर्जं काढतात. चार आणि पाच हजार रुपये वसुलीसाठी बँकेचे वसुली अधिकारी गावोगाव फिरताना दिसतात..चार-पाच किंवा दहा एकर कोरडवाहूमध्ये वार्षिक उत्पन्न ते किती मिळते! एकरी वीस हजार धरले आणि त्यातून त्यांची गुंतवणूक वजा केली तर एकरी पाच हजार पण शिल्लक राहत नाहीत. बहुतांश शेतकरी समाजाचे निव्वळ वार्षिक उत्पन्नच जिथं पन्नास हजार ते एक लाख आहे तिथे एकविसाव्या शतकात या संपूर्ण ग्रामीण समाजाला कुठे स्थान असणार आहे?.मग मी तालुक्याला म्हणजे बार्शीला जातो. ऐन दिवाळीत तिथली बाजारपेठ मला रिकामी दिसली. कापड दुकानदाराला विचारले, ‘कसं काय दुकान रिकामंच, नाही तर एके काळी दुकानात उभा राहायला जागा नसायची?’ तर तो म्हणाला, ‘शेतकऱ्यांच्या हातातच काय नाही तर आमच्या हातात कसं येईल?’ फक्त बार्शीतल्या नोकरदार वर्गावर कसा धंदा चालायचा? अशा तालुक्याच्या शहराच्या अवतीभोवती शहरातील नोकरदारांचे बंगले असतात. .ते बघून आपल्याला वाटू शकते की शहरात समृद्धी आहे. पण ती समृद्धी आसपासच्या अनेक गावांतून आलेल्या निवडक पैसेवाल्यांची आणि अगदीच निवडक नोकरदारांची असते. त्यावरून संपूर्ण समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज करणे मोठीच चूक ठरू शकते. ते बंगले पण आता रिकामेच आहेत. कारण त्यांची मुले शिकली आणि पुण्या-मुंबईला स्थायिक झाली. निवृत्त शिक्षक, निवृत्त प्राध्यापक, बँकेचे अधिकारी आता तिथे म्हातारपणी एकटेच राहतात. कधी कधी दिवाळीला मुलं आली की त्यांचं घर भरलेलं असतं. नाही तर इतर वेळी शहरातल्या या बंगल्यांच्या गल्ल्यांमध्ये सुद्धा गावातील दुपारचे भकासपण अंगावर येते.(लेखक मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.