Agriculture Crisis: शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर कोलमडलेली आर्थिक गणिते आणि बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे अशा कुटुंबातील अनेक मुला-मुलींना कायमची शाळा सोडावी लागते. शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी दरवेळी छापून येते, पण त्या एका मृत्यूमागे कोसळणाऱ्या कुटुंबाची आणि विशेषतः शिक्षणापासून दूर ढकलल्या जाणाऱ्या मुलांची व्यथा मात्र समाजाच्या केंद्रस्थानी येत नाही.