Farmer Issues: यवतमाळ तालुक्यात यंदा रब्बी हंगामात गव्हाला पोषक थंडी व अनुकूल हवामान लाभल्याने उत्पादन भरघोस झाले आहे. अनेक भागांत एकरी १५ ते २० क्विंटलपर्यंत उतारा मिळाला आहे. मात्र, भरघोस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गव्हाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे..कृषी मूल्य आयोगाने यंदा गव्हाचा हमीभाव २,५८५ रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष बाजारात केवळ २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे ३५० ते ४८५ रुपयांनी कमी दराने विक्री करावी लागत आहे. गेल्या वर्षी याच काळात गव्हाला ३,००० ते ३,५०० रुपये दर मिळत होता. त्यामुळे यंदा दरातील पडझडीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे..Wheat Production: गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढीची अपेक्षा.दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर आखाती देशांतील युद्धपरिस्थितीचा परिणाम कृषी बाजारपेठेवर दिसून येत आहे. केळी, टरबूज, कांदा, द्राक्ष यांसह गव्हाच्या दरावरही दबाव निर्माण झाला आहे. उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठेतील मागणी व दर यांचा समतोल बिघडल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे..Wheat Production: योग्य व्यवस्थापनाने गहू उत्पादनात क्रांती शक्य.महाराष्ट्रात गव्हाचे क्षेत्र सुमारे १५.२७ लाख हेक्टर इतके मोठे असतानाही शासकीय खरेदी यंत्रणा प्रभावीपणे उभी राहिलेली नाही. पंजाब व हरियाणा राज्यांप्रमाणे एफसीआयमार्फत हमीभावाने मोठ्या प्रमाणावर खरेदी होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. नाफेडकडूनही गहू खरेदीसाठी ठोस यंत्रणा उभारण्यात आलेली नसल्याची तक्रार आहे..“राज्य शासनाने तातडीने गहू खरेदी केंद्र सुरू करावीत किंवा बाजारभाव व हमीभावातील सुमारे ६०० रुपयांचा फरक ‘भावांतर’ योजनेतून द्यावा. केंद्र व राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.”- मनीष जाधव, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.