डॉ. मुकुंद शिंदे Traditional Food: रसाळ आहार आणि गहूआमचे बालपण ज्वारी, बाजरीच्या भाकरीवरच सुरू झाले. गव्हाची चपाती आणि पुरणपोळी सण आल्यावरच पाहायला मिळायची. हरितक्रांतीमुळे हळूहळू ज्वारी, बाजरीची भाकरी दुर्मीळ होऊन गहू आणि तांदळाचा जेवणात सर्रास वापर सुरू झाला. जाड भाकरीपेक्षा मऊ गव्हाच्या चपातीला नेहमीच पसंती असायची. .हरितक्रांतीला जरी १९६०-७० च्या दशकात सुरुवात झाली तरी ब्रिटिशांनी १९३२ मध्ये निफाड जवळ कुंदेवाडी येथे गहू संशोधन केंद्र सुरू केले होते. ब्रिटिशांच्या संशोधक वृत्तीला मानले पाहिजे. राज्याची भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा अभ्यास करून त्यांनी निफाड येथे गहू संशोधन केंद्राची निवड केली आणि गव्हावर तांबेरा पडण्यासाठी पोषक वातावरण महाबळेश्वरला असल्यामुळे तांबेरा संशोधन केंद्राची स्थापना महाबळेश्वर येथे केली..Soil Health: जमिनीच्या गुणधर्मानुसार खतांची योग्य निवड कशी करावी? .१९६९ मध्ये राहुरी येथे कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्र कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आले. वेगवेगळ्या पिकांचे सुधारित वाण तयार करणे हे कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा भाग. निफाड येथील संशोधन केंद्राने गव्हाचे बरेचसे सुधारित वाण प्रसारित केले आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. शेतकऱ्यांनी पण या गव्हाच्या वाणांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली. यामध्ये निश्चितच कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. त्यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे डॉ. प्रमोद रसाळ..१९८४ मध्ये डॉ.प्रमोद रसाळ यांनी राहुरीला एमएससी केल्यानंतर निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात वरिष्ठ संशोधन सहायक पदावर रुजू झाले. यथावकाश गहू संशोधनामध्ये त्यांची आवड वाढत गेली. पुढे त्यांनी १९९२ साली राहुरी कृषी विद्यापीठात पीएचडी केली आणि तिथून गव्हाच्या संशोधनाला त्यांनी वाहून घेतले. १९९५ मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना (एफएओ), रोम तर्फे मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय गहू व मका संशोधन केंद्र येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि तिथून त्यांच्या संशोधनाला एक कलाटणी मिळाली..मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रामध्ये डॉ. रसाळ यांनी डॉ. संजय राजाराम या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञाबरोबर तीन महिने संशोधनाचे काम केले. सकाळी सहा वाजता त्यांचे शेतावर काम सुरू व्हायचे ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालायचे. याच ठिकाणी त्यांची भेट हरितक्रांतीचे जनक व नोबेल पारितोषिक विजेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्याशी झाली. मेक्सिकोतून आल्यानंतर निफाड येथील संशोधनाला नवीन बळ मिळाले. डॉ. रसाळ यांनी तब्बल २९ वर्ष फक्त निफाड येथील संशोधन केंद्रात काम केले. .Agri Water Management: तुषार सिंचनाधारित मॉडेलने वाढविली रब्बी पिकांची उत्पादकता .मला वाटतं राहुरी कृषी विद्यापीठात हा एक विक्रम असेल. २९ वर्षाच्या या कालावधीमध्ये डॉ. रसाळ यांचा गव्हाचे वाण विकसित करण्यामध्ये निश्चितच सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कारकिर्दीत १९९५ नंतर १२ गव्हाचे वाण प्रसारित करण्यात आले. यामध्ये निफाड ३४, गोदावरी, पंचवटी, नेत्रावती, त्रंबक, फुले समाधान हे गाजलेले वाण. तांबेरा प्रतिबंधक आणि जास्त उत्पादन देणारे वाण असल्यामुळे निश्चितच ते शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले. सध्या राज्यातील गहू पिकाच्या एकूण क्षेत्राखालील २५ टक्के क्षेत्र हे फुले समाधान या वाणाचे आहे. हे निश्चितच शेतकऱ्यांच्या, शास्त्रज्ञांच्या आणि कृषी विद्यापीठाच्या दृष्टीने एक समाधानाची बाब आहे..डॉ. रसाळ सांगतात, की गव्हाचा एक वाण तयार करण्यासाठी दहा ते बारा वर्षे लागतात. एखादा वाण तयार झाल्यानंतर त्याची महाबळेश्वर, हिमाचल प्रदेश मधील लाहौल-स्पीती, तमिळनाडू येथील वेलिंग्टन येथे तांबेरा रोगासाठी चाचणी केली जाते. त्या वाणावर तांबेरा दिसला तर तो वाण नाकारला जातो. पुन्हा नवीन वाण तयार करून या प्रक्रियेची पुनरावृत्ती केली जाते. परंतु निफाड येथील संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांची टीम ज्यामध्ये डॉ. गाडेकर, डॉ. दोडके, डॉ. भोईटे, डॉ. भावसार, डॉ. काचोळे, डॉ. कुसाळकर, डॉ. जे एम पाटील यांचा समावेश होता. .या टीमने संशोधनाला सातत्य दिल्यामुळे या संशोधन केंद्राने राज्यासाठी चांगले गव्हाचे वाण दिले. यामुळे राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर या संशोधन केंद्राचे नाव नेहमी घेतले जाते. आपण आहारात नेहमी गव्हाची चपाती आणि सणाला पुरणपोळी आवडीने खातो. परंतु यामागे डॉ. रसाळ सारख्या शास्त्रज्ञांची तपश्चर्या व शेतकऱ्यांचे कष्ट असतात आणि त्यामुळे आपला आहार निश्चितच रसाळ होतो याचे याप्रसंगी स्मरण होते.- डॉ. मुकुंद शिंदे९४०३६०५९७९(माजी विभाग प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि संचालक, एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, नाशिक).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.