Parbhani News: यंदाच्या (२०२५) रब्बी हंगाम शुक्रवार (ता. २८) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यात गव्हाची ४७ हजार २०९ हेक्टरवर पेरणी झाली तर या दोन जिल्ह्यात एकूण रब्बीची ३ लाख ६७ हजार २४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. .सुरुवातीला पेरणी केलेली ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु वाफसा नसल्यामुळे जमीन तयार करण्यास वेळ लागल्यामुळे अनेक भागात अजूनही अनेक भागात रब्बीची पेरणी सुरू आहे..शुक्रवार (ता. २८) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ९७७ पैकी २ लाख २८ हजार ३३४ हेक्टरवर (८४.२६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गव्हाची ३४ हजार ९३४ पैकी २२ हजार ६२९ हेक्टर (६४.७७ टक्के),.ज्वारीची ९७ हजार ४६४ पैकी ७३ हजार ४५८ हेक्टर (७५.३७ टक्के), मक्याची १ हजार ५०२ पैकी ३०० हेक्टर (१९.९८ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख ३४ हजार ८४१ पैकी १ लाख ३१ हजार ३३१ हेक्टर (९७.४० टक्के) पेरणी झाली..Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; गव्हाचा बाजार स्थिर, कारली तसेच मसूरचे दर टिकून, हिरवी मिरचीला उठाव.करडईची १ हजार ६०२ पैकी ५१२ हेक्टर (३१.९७ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण तृणधान्यांची १ लाख ३४ हजार १४१ पैकी ९६ हजार ४२५ हेक्टर (७१.८८ टक्के), कडधान्यांची १ लाख ३५ हजार १९ पैकी १ लाख ३५ हजार ३६० हेक्टर (९७.२९टक्के), गळीत धान्याची १ हजार ८१६ पैकी ५४९ हेक्टर (३०.२४ टक्के) पेरणी झाली..Agrowon Podcast: गव्हाचा बाजार स्थिर; केळीला उठाव, कोथिंबरच्या दरात सुधारणा, गवारचे दर तेजीतच, तर पेरुची आवक घटली.हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६९ हजार २२० पैकी १ लाख ३८ हजार ९१२ हेक्टरवर (८२.०९टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गव्हाची ३३ हजार ४६९ पैकी २४ हजार ५८० हेक्टर (७३.४४ टक्के),ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ९ हजार ५६७असतांना ११ हजार ७३ हेक्टर(११५.७३ टक्के), मक्याची ८६७ पैकी ३७२ हेक्टर (४२.८६ टक्के) पेरणी झाली. .हरभऱ्याची १ लाख २१ हजार ६२ पैकी १ लाख १ हजार ५५१ हेक्टर(८३.८८ टक्के) पेरणी झाली.करडईची २ हजार ५२ पैकी १ हजार १४ हेक्टर (४९.३९टक्के) तर तिळाची ३२ हेक्टर,सुर्यफुलाची ३० हेक्टर पेरणी झाली.जिल्ह्यात एकूण तृणधान्यांची ४४ हजार ५२९ पैकी ३६ हजार ११९ हेक्टर (८१.११ टक्के), कडधान्यांची १ लाख २१ हजार ३३७ पैकी १ लाख १ हजार ६४९३ हेक्टर (८३.७७ टक्के), गळीत धान्यांची ३ हजार ३५४पैकी १ हजार १४४ हेक्टर (३४.११ टक्के) पेरणी झाली,असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.